LSG vs MI Live Score IPL 2024: लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध मुंबई इंडियन्स मॅच,रोहित शर्माला वाढदिवसाचं गिफ्ट मिळणार?

LSG vs MI Live Score IPL 2024 : आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जाएंटस आणि मुंबई इंडियन्स आमने सामने येणार आहेत.आयपीएलमधील ही 48 वी लढत आहे.

युवराज जाधव Last Updated: 30 Apr 2024 11:22 PM
मुंबई इंडियन्सचा पराभव

लखौनाचा चार विकेटने विजय

आयुष बडोनी बाद

आयुष बडोनी सहा धावा काढून बाद.. लखनौला सहावा धक्का

दीपक हुड्डा स्वस्त तंबूत 

दीपक हुड्डा फक्त 18 धावा खेळून बाद झाला. अश्टन टर्नर चार धावा काढून बाद

मार्कस स्टॉयनिसची अर्धशतकी खेळी

 


मार्कस स्टॉयनिस यानं शानदार अर्धशतक ठोकलं. स्टॉयनिसने 45 चेंडूमध्ये 62 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि सात चौकाराचा समावेश आहे.

अर्शिन गोल्डन डकचा शिकार

अर्शिन कुलकर्णीला खातेही उघडता आले नाही.

 केएल राहुलची 28 धावांची खेळी

केएल राहुल यानं 22 चेंडूत 28 धावांची खेळी केली.

लखनौचा अर्धा संघ तंबूत

127 धावांमध्ये लखनौचा अर्धा संघ तंबूत परतलाय. सामना रोमांचक स्थितीमध्ये पोहचलाय.. लखनौला विजयासाठी 15 चेंडूत 18 धावांची गरज

मुंबईची 144 धावांपर्यंत मजल

मुंबईची 144 धावांपर्यंत मजल

मोहम्मद नबीही स्वस्तात बाद

मोहम्मद नबीच्या रुपाने मुंबईला सातवा धक्का

मुंबईला सहावा धक्का

नेहाल वढेराच्या रुपाने मुंबईला सहावा धक्का बसला... वढेरा 46 धावांवर बाद झालाय. मुंबई सहा बाद 112 धावा

मुंबईचा अर्धा संघ तंबूत

मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतलाय. 108 धावांत मुंबईची फलंदाजी ढेपाळली.. 

हार्दिक पांड्या गोल्डन डक

हार्दिक पांड्या शून्यावर बाद झालाय.. 

मुंबईला तिसरा धक्का

 


तिलक वर्माच्या रुपाने मुंबईला तिसरा धक्का बसलाय.

मुंबईला दोन धक्के

ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात तंबूत परतले. मुंबई 2 बाद 26 धावा

लखनौ सुपर जाएंटस कमबॅक करणार?

लखनौ सुपर जाएंटसचा त्यांच्या होम ग्राऊंडवर राजस्थान रॉयल्सनं पराभव केला होता. आज लखनौ कमबॅक करतं का ते पाहावं लागेल. 

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सची कामगिरी कशी राहिली?

मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये 9 पैकी 6 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तर, केवळ तीन मॅचमध्ये त्यांना विजय मिळाला.

LSG vs MI Live Score : मयंक यादव फिट

लखनौ सुपर जाएंटसचा फास्ट बॉलर मयंक यादव फिट झाला आहे. मयंक यादव लखनौच्या तिसऱ्या मॅचमध्ये जखमी झाला होता. 

मुंबई आणि लखनौ आमने सामने, नेमकं कोण कुणाला वरचढ?

आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंटस आणि मुंबई इंडियन्स चारवेळा आमने सामने आले आहेत. तीन मॅच लखनौनं जिंकल्या तर मुंबईनं एक मॅच जिंकली आहे.

Mumbai Indians : मुंबईला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक

मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलच्या प्ले ऑफ जाण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असल्यास राहिलेल्या सर्व मॅच जिंकाव्या लागणार आहेत.

पार्श्वभूमी

LSG vs MI, IPL 2024 Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live : आयपीएलमध्ये केएल राहुलच्या नेतृ्त्त्वातील लखनौ सुपर जाएंटस आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्स आमने सामने  येणार आहेत. ही आयपीएलमधील 48 वी लढत आहे. यंदा लखनौ आणि मुंबई पहिल्यांदा आमने सामने येत आहेत. लखनौचा संघ पाचव्या तर मुंबईचा संघ नवव्या स्थानावर आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.