RR vs LSG Score Live IPL 2024: राजस्थानची विजयी सुरुवात, लखनौला पराभवाचा धक्का

RR vs LSG Score Live IPL 2024: लखनौ संघाचे नेतृत्व लोकेश राहुल तर राजस्थानच्या संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे असेल.

मुकेश चव्हाण Last Updated: 24 Mar 2024 07:32 PM
केएल. राहुलचं अर्धशतक व्यर्थ, राजस्थानची विजयी सलामी

राजस्थाननं 20 रन्सनी लखनौचा पराभव केला. लखनौचा संघ 6 विकेटवर 173 धावांपर्यंत मजल मारू शकला. 

राजस्थान रॉयल्सची विजयी सलामी, लखनौला पराभवाचा धक्का

राजस्थान रॉयल्सनं आयपीएलमधील अभियानाची सुरुवात विजयानं केली आहे. संजू सॅमसनच्या राजस्थाननं  केएल. राहुलच्या लखनौला पराभवाचा झटका दिला आहे.  

लखनऊला सहावा धक्का, स्टॉयनिस 3 धावा करुन बाद

लखनऊला सहावा धक्का बसला असून स्टॉयनिस 3 धावा करुन बाद झाला आहे.  

लखनौला पाचवा धक्का, केएल. राहुल मोक्याच्या क्षणी बाद 

केएल. राहुल मोक्याच्या क्षणी 58 धावा करुन बाद झाला आहे. त्यामुळं लखनौ 23 धावांमध्ये 49 धावांचं आव्हान गाठू शकणार की नाही हे पाहावं लागेल.

LSG vs RR : लखनौला 6 ओव्हर्समध्ये 65 धावांची गरज

लखनौ सुपर जाएंटसला विजयासाठी 6 ओव्हर्समध्ये 65 धावांची गरज आहे. केएल. राहुलनं अर्धशतक झळकावल्यानं लखनौचं आव्हान टिकून आहे.

LSG vs RR : लखनऊचा डाव केएल. राहुलनं सावरला, राजस्थानचं तगडं आव्हान

राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्यातील मॅचमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या लखनौनं 10 ओव्हर्सनंतर 4 बाद  76 धावा केल्या आहेत. के. एल. राहुलनं  25  धावा केल्या आहेत.

RR vs LSG : संजू सॅमसननं चहलला बॉलिंग दिली, पहिल्याच ओव्हरमध्ये लखनऊला धक्का

संजू सॅमसननं चहलला बॉलिंग देताच त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये लखनऊला धक्का  बसला आहे. चहलनं दीपक हुड्डाला बाद केलं आहे. 

LSG : पॉवरप्ले मध्ये लखनऊच्या 48 धावा

राजस्थाननं ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौनं पॉवरप्लेमध्ये तीन बाद ४८ धावा केल्या आहेत. 

लखनौला तिसरा धक्का, आयुष बदोनी बाद

राजस्थान रॉयल्सपुढं लखनौच्या टॉप ऑर्डरनं नांगी टाकल्याचं चित्र आहे. लखनऊला अवघ्या 11 धावांमध्ये तिसरा धक्का बसला आहे. 

लखनौला दुसरा धक्का, पडिक्कल शुन्यावर बाद

लखनौला दुसरा धक्का बसला आहे. पडिक्कल शुन्यावर बाद झाला आहे. 

लखनौला पहिला धक्का, क्विंटन डी कॉक बाद

राजस्थाननं दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली आहे. लखनौला पहिला धक्का क्विंटन डीक कॉकच्या रुपानं बसला आहे. 

राजस्थाननं लखनौसमोर ठेवलं विजयासाठी 194 धावांचं आव्हान

राजस्थान रॉयल्सनं 20 व्या ओव्हरमध्ये कॅप्टन संजू सॅमसन याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखनौपुढं विजयासाठी 194 धावांचं आव्हान ठेवलं आहे.  संजू सॅमसन यानं कर्णधारपदाला साजेशी खेळी करत 82 धावा केल्या आहेत.

राजस्थानला चौथा धक्का, हेटमायर बाद

राजस्थानला चौथा धक्का बसला असून हेटमायरला रवि बिश्नोईनं बाद केलं आहे.

RR Score : राजस्थान रॉयल्सच्या 150 धावा पूर्ण

राजस्थान रॉयल्सच्या 17 व्या ओव्हरपर्यंत 150 धावा पूर्ण झाल्या आहेत. राजस्थानचा डाव कॅप्टन संजू सॅमसननं सावरला आहे. 

राजस्थानला तिसरा धक्का , रियान पराग 43 धावा करुन बाद

राजस्थानला तिसरा धक्का रियान पराग 43  धावा करुन बाद  झाला आहे. राजस्थाननं आतापर्यंत 3 बाद 142 धावा केल्या आहेत.

संजू आणि परागची 75 धावांची भागिदारी पूर्ण

संजू सॅमसन आणि रियान पराग यांच्यातील 75 धावांची भागिदारी पूर्ण झाली आहे. पराग आणि सॅमसन यांनी  राजस्थानचा डाव सावरला आहे. 

RR: संजू सॅमसनचं अर्धशतक पूर्ण

संजू सॅमसनचं अर्धशतक पूर्ण झालं आहे. राजस्थानच्या कर्णधार पदाला साजेशी कामगिरी संजू सॅमसननं केली आहे. 

राजस्थानच्या 2 बाद 110 धावा, संजू सॅमसननं डाव सावरला

राजस्थानच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. संजू सॅमसन आणि रियाग पराग यांनी डाव सावरला असून 12 व्या ओव्हरपर्यंत राजस्थाननं 2 बाद  110 धावा केल्या आहेत. 

RR Score : राजस्थानच्या 10 ओव्हर्सपर्यंत 89 धावा

राजस्थानचा डाव संजू सॅमसन आणि पराग यांनी सावरला आहे. संजू सॅमसननं 35 धावा केल्या आहेत. राजस्थाननं 10 ओव्हर्सनंतर 2 बाद 89 धावा केल्या आहेत. 

RR Score : राजस्थानच्या 10 ओव्हर्सपर्यंत 89 धावा

राजस्थानचा डाव संजू सॅमसन आणि पराग यांनी सावरला आहे. संजू सॅमसननं 35 धावा केल्या आहेत. राजस्थाननं 10 ओव्हर्सनंतर 2 बाद 89 धावा केल्या आहेत. 

राजस्थानला दुसरा धक्का, यशस्वी जयस्वाल आऊट

राजस्थानला दुसरा धक्का बसला असून यशस्वी जयस्वाल आऊट झाला आहे. तर राजस्थानच्या 50 धावा देखील झाल्या आहेत. 

RCB : राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का

राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का डॉस बटलर  11 धावा करुन बाद झाला आहे. 

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन):

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन)

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल

राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 





राजस्थान रॉयल्सला संपवणार 16 वर्षांचा दुष्काळ? 

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2008 चे विजेतेपद जिंकले होते, परंतु तेव्हापासून त्यांना विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. त्याचवेळी, गेल्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा संघ पात्रता फेरीत पोहोचला होता, परंतु त्यानंतर विशेष यश मिळवता आले नाही. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स 16 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. 

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्याआधी लखनौचे मुख्य प्रशिक्षक काय म्हणाले?

सरावात निकोलस पूरनची तुफान फटकेबाजी

हल्लाबोल....राजस्थान रॉयल्सचं ट्विट

RR vs LSG सामन्यात 11 खेळाडू तुम्हाला करतील मालामाल

कर्णधार संजू सॅमसनसाठी राजस्थान रॉयल्सकडून खास ट्विट

राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, ध्रुव जुरेल, आर अश्विन, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट.


 

लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, दीपक हुडा, केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि रवी बिश्नोई.

आतापर्यंत तीनवेळा आमने-सामने

आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स आयपीएलमध्ये तीनदा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने 2 वेळा विजय मिळवला आहे. तर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने 1 विजय नोंदवला आहे. अशाप्रकारे, लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा वरचष्मा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

खेळपट्टी कशी असेल?

एस. मानसिंग मैदानाच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे आहे. या विकेटवर फलंदाज सहज धावा करतात. गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्ससमोर 214 धावांचे लक्ष्य ठेवले होते. याशिवाय या विकेटवर सलग 200 हून अधिक धावा केल्या आहेत. या मैदानावर संघांना धावांचा पाठलाग करण्यास आवडते. आतापर्यंत झालेल्या 52 आयपीएल सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी 34 वेळा विजय मिळवला आहे.

केएल राहुल, क्चिटन डी कॉक, निकोलस पूरन यांच्याकडे धावा काढण्याची जबाबदारी

लखनौकडून केएल राहुलसह क्चिटन डी कॉक, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन आणि देवदत्त पडिक्कल यांच्याकडे धावा काढण्याची जबाबदारी असेल. दीपक हुडा हादेखील उपयुक्त फलंदाज आहे. ४१ वर्षांचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याच्यासह, स्टोयनिस, शिवम मावी हे गोलंदाज आहेत. रवी बिश्नोई चार षटकांत काय कमाल करेल, हेदेखील पाहावे लागेल.

राजस्थान रॉयल्सची भक्कम बाजू

राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनच्या सोबतीला यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर हे फलंदाज तर ध्रुव जुरेल हा फिनिशर आहे. मधली फळी रोवमन पॉवेल, शिमरोन हेटमायर भक्कम करतील.गोलंदाजीचा भार रविचंद्रन अश्विन, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नंदे बर्गर, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक, तनुश कोटियान सांभाळतील.

केएल राहुल यष्टिरक्षण करणार?

जखमेतून परतलेल्या केएल राहुलच्या फॉर्म आणि फिटनेसकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच केएल राहुल यष्टिरक्षण करणार की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात होते. याचदरम्यान तो यष्टिरक्षणचा सराव करताना दिसला. 





पार्श्वभूमी

RR vs LSG Score Live IPL 2024:  इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) टी-20 क्रिकेटमध्ये आज दुपारच्या सत्रात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) सामना होणार आहे. दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. लखनौ संघाचे नेतृत्व लोकेश राहुल तर राजस्थानच्या संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे असेल. आयपीएलच्या या हंगामात पहिला विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहे. 





- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.