IPL 2024 KKR vs SRH:  कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा (SRH) पराभव करत आयपीएलच्या 17 व्या हंगामात जेतेपद पटकावले. कोलकाताचे हे तिसरं जेतेपद ठरलं. याआधी 2012 आणि 2014 साली कोलकाताने अंतिम फेरीत विजय मिळवला होता. कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि संघ तसेच मेंटॉर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) केकेआरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. केकेआरच्या विजयानंतर गौतम गंभीरचे खूप कौतुक होत आहे. 


कोलकाता नाइट रायडर्सने संपूर्ण हंगामात अतिशय आक्रमक खेळ दाखवला. गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. त्यांनी क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले आणि नंतर त्याच संघाचा पराभव करून तिसरी आयपीएल ट्रॉफी जिंकली. उत्कृष्ट गोलंदाजीच्या कामगिरीच्या जोरावर कोलकाताने हैदराबादला केवळ 113 धावांवर रोखले. यानंतर व्यंकटेश अय्यरने झंझावाती अर्धशतक झळकावले आणि 11 षटके पूर्ण होण्यापूर्वीच सामना संपवला.


अभिषेक नायरची सर्वात मोठी भूमिका-


सामना संपल्यानंतर व्यंकटेश अय्यरने सांगितले की, त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना विजयासाठी तयार करण्यात अभिषेक नायरची सर्वात मोठी भूमिका होती. केकेआर अकादमीचे प्रमुख आणि संघाचे सहाय्यक प्रशिक्षक यांनी प्रत्येक खेळाडूला अभिषेक नायर यांनी अशा प्रकारे तयार केले की संघाला विरोधी संघावर वर्चस्व राखता येईल आणि तेवढ्या प्रमाणात खेळता येईल. व्यंकटेश पुढे म्हणाला की, आज आमच्या संघाने नोंदवलेल्या विजयामागे या एका व्यक्तीची सर्वात मोठी भूमिका आहे. आज ही ट्रॉफी जिंकण्यात आपण सर्वजण यशस्वी झालो, तर त्यामागे अभिषेक नायरची मेहनत दडलेली आहे.


सर्व खेळाडूंनी अभिषेक नायरला दिले श्रेय-


आमच्या संघाची फलंदाजी मजबूत करण्यात आणि प्रत्येकाला आत्मविश्वासाने भरण्यात अभिषेक नायरचा मोठा वाटा आहे. सर्व ट्रॉफी जिंकल्यानंतर आपण खेळाडूंबद्दल चर्चा करतो पण मला वाटते की या चॅम्पियन व्यक्तीबद्दलही बोलले पाहिजे, असं व्यंकटेश म्हणाला. व्यंकटेशसोबत वरुण चक्रवर्ती, नितीश राणा, हर्षित राणा आणि इतर तरुणही तिथे उभे होते. अभिषेकच्या विजयाचे श्रेय सर्वांनीच दिले. अभिषेक नायरने ज्या प्रकारे संघाला पाठिंबा दिला आणि जिंकण्यासाठी प्रेरणा दिली तीच संघाच्या यशाची गुरुकिल्ली ठरल्याचे सर्वांनी सांगितले.






सुनील नरेनची 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून निवड-


महत्त्वाची बाब म्हणजे कोलकाताचा खेळाडू सुनील नरेनची 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून निवड करण्यात आली. नरेनने अष्टपैलूची भूमिका बजावली. धावा करण्यासोबतच त्याने विकेट्सही घेतल्या. नरेनने 15 सामन्यात 17 विकेट घेतल्या. केकेआरसाठी फिलिप सॉल्टनेही चांगली कामगिरी केली. त्याने 12 सामन्यात 435 धावा केल्या. अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 113 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताने 10.3 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले.


संबंधित बातम्या:


IPL 2024 Catch Of The Season: चित्यासारखी धाव, बिबट्यासारखी झेप; यंदा रमणदीप 'Catch Of The Season'चा ठरला मानकरी, पाहा Video


IPL 2024 Final Prize Money KKR vs SRH: विजेता, उपविजेता, इमर्जिंग प्लेअर, ऑरेंज- पर्पल कॅप; कोणाला किती रुपये मिळाले?, पाहा A to Z माहिती


IPL 2024 KKR Gautam Gambhir: 'ज्याचे विचार अन्...' कोलकाताच्या विजयानंतर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया; सोशल मीडियावर चर्चांना उधाण