IPL 2024 : आयपीएलचं 17 वं पर्व मोठ्या धामधुमीत पार पडलं. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR Vs SRH) या दोन तगड्या टीममध्ये या पर्वाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात केकेआरने (KKR) बाजी मारून ट्रॉफीवर पुन्हा एकदा आपलं नाव कोरलं. दरम्यान, गेल्या दहा वर्षांपासून केकेआर ही टीम जेतेपदाची वाट पाहात होती. शेवटी आता कोलकाताने आपयीलची ट्रॉफी खिशात घातली आहे. दमरम्यान या विजयानंतर केकेआरचा सहमालक असलेल्या अभिनेता शाहरुख खानला (Shah Rukh Khan) नेमका काय फायदा होणार? असे विचारले जात आहे.


टीम विजयी होताच शाहरुखला आनंद गगनात मावेना


अभिनेता शाहरुख खान हा कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल टीमचा सहमालक आहे. त्याची या टीममध्ये 55 टक्के मालकी आहे. कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे अनेक सामने पाहण्यासाठी तो आपल्या कुटंबासह मैदानात दिसतो. यावेळीदेखील तो आपली मुलं-बायकोसह अंतिम सामना पाहायला आला होता. केकेआरने सामना जिंकल्यानंतर शाहरुखचा आनंद गगनात मावत नव्हतो. विजयी होताच शाहरुखने भावूक होत आपल्या मुलांना मिठीत घेत आनंद साजरा केला. तसेच या विजयानंतर त्याने मैदानात उतरून आपल्या चाहत्यांसोबतही हा आनंद साजरा केला.   


आयपीएल संघांच्या कमाईचे माध्यम कोणते?


खरं म्हणजे अभिनेता असल्यामुळे शाहरुख चित्रपटांच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवतो. त्याचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. यासह तो वेगवेगळ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधूनही पैसे कमवतो. शाहरुखच्या कमाईचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. यासह दरवर्षी आयपीएलच्या हंगामातही तो चांगले पैसे कमवतो. केकेआर हा संघ त्याच्या मालकीचा असल्यामुळे त्याला क्रिकेटच्या माध्यमातून पैसे मिळतात. प्रसारण आणि स्पॉन्सरशीपच्या माध्यमातून बीसीसीआयला काही पैसे मिळतात. या पैशातील काही हिस्सा आयपीएलच्या सर्व टीमला मिळतो. शाहरुखच्या केकेआर टीमलाही हे पैसे मिळतात. यासह आयपीएल सामन्यादरम्यान ब्रँडच्या जाहिराती, सामन्यांची फीस, बीसीसीआयचा इव्हेन्ट रिव्हेन्यू या माध्यमातून शारुखला पैसे मिळतात.


शाहरुख खान कमवतो एवढे कोटी


प्रत्येक आयपीएलमधून शाहरुखला भरपूर पैसे मिळतात. मात्र हे पैसै नक्की किती आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. वेगवेगळ्या माध्यमातील रिपोर्ट्सनुसार शाहरुख खानला प्रत्येक आयपीएलमध्ये एकूण 250 से 270 कोटींची कमाई होते. प्रत्यक्ष सामने चालू असताना काही खर्चदेखील होतो. खेळाडूंवर होणारा खर्च, मॅनेजमेंट टीमवर होणारा खर्च यामध्ये साधारण 100 कोटी रुपये खर्च होतात. म्हणजेच सर्व खर्च झाल्यावर केकेआरकडे साधारण 150 कोटी रुपये मिळतात. शाहरुख खानची केकेआरच्या टीममध्ये 55 टक्के हिस्सेदारी आहे. या मालकीच्या हिशोबाने शाहरुखला प्रत्येक आयपीएलमध्ये साधारण 70 ते 80 कोटी रुपये मिळतात. 


हेही वाचा :


ट्रॅफिक ते गॅस सिलिंडर, येत्या जून महिन्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम; जाणून घ्या अन्यथा खिशाला लागेल कात्री!


ऑटो क्षेत्रातील 'ही' कंपनी गुंतवणूकदारांसाठी लकी, वर्षभरात दिले 66 टक्क्यांनी रिटर्न्स!