IPL 2024 KKR vs PBKS Marathi News: पंजाब किंग्स (PBKS) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात आयपीएल 2024 चा 42 वा सामना खेळला गेला. कोलकात्याच्या इडन गार्डन्समध्ये दोघांमध्ये सामना खेळला गेला. पंजाब आणि कोलकाताचा सामना आयपीएल आणि टी 20च्या दृष्टीने ऐतिहासिक सामना होता. या सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम नोंदवला गेला. 


पंजाब आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात आयपीएल आणि टी-20 क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार मारले गेले. इडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब आणि कोलकाताच्या फलंदाजांनी एकूण 42 षटकार ठोकले. या सामन्यात यापूर्वीचा विक्रम मोडला होता, जो याच मोसमात हैदराबाद आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात बनला होता. मुंबई-हैदराबाद सामन्यात एकूण 38 षटकार लगावले होते. 


पुरुषांच्या टी 20 सामन्यात सर्वाधिक षटकार


42 षटकार - KKR विरुद्ध PBKS, कोलकाता, IPL 2024
38 षटकार - SRH vs MI, हैदराबाद, IPL 2024
38 षटकार - RCB vs SRH, बंगळुरू, IPL 2024
37 षटकार - बल्ख लिजेंड्स विरुद्ध काबुल झवानन, शारजाह, एपीएल 2018/19
37 षटकार - SKNP vs JT, Basseterre, CPL 2019.






पंजाबने ऐतिहासिक धावांचा केला पाठलाग


इडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्सने ऐतिहासिक धावांचा पाठलाग करत विजयाची नोंद केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाइट रायडर्स संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 261 धावा केल्या. संघासाठी फिलिप सॉल्टने 37 चेंडूत 75 धावांची तर सुनील नरेनने 32 चेंडूत 71 धावांची जलद खेळी खेळली. सॉल्टने 6 चौकार आणि 6 षटकार मारले, तर नरेनने 9 चौकार आणि 4 षटकार मारले.


पंजाब किंग्जने लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरले आणि 262 धावांचे ऐतिहासिक लक्ष्य 18.4 षटकात 2 गडी राखून पार करून विजयाची नोंद केली. पंजाबकडून सलामी देणाऱ्या जॉनी बेअरस्टोने 48 चेंडूंत 8 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. याशिवाय शशांक सिंगने 28 चेंडूत 2 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली.


संबंधित बातम्या:


टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!


ICC T20 WC 2024: विराट कोहली, रिंकू सिंगला डच्चू, कृणाल पांड्याला संधी; संजय मांजरेकरांनी विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात धक्कादायक नावं


जसप्रीत बुमराहला भारत सोडून कॅनडाला जायचे होते...; पत्नी संजनाला सांगितली भावनिक स्टोरी