Sanjay Manjrekar Picks Team India For T20 WC: सध्या आयपीएलचा हंगाम सुरु आहे. आयपीएलनंतर लगेच आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ही स्पर्धा सुरु होणार आहे. 1 जूनला अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. विश्वचषकाच्या या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना 5 जूनला होईल. तर भारताचा दुसरा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. 


भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघातील 15 जणांची निवड केली आहे. (Sanjay Manjrekar Picks Team India For T20 WC) यामध्ये अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या, विराट कोहली, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग यांना स्थान दिलेले नाही. संजय मांजरेकर यांनी सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालची निवड केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी केएल राहुलला संधी दिली आहे. 


संजय मांजरेकर यांनी चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. तर यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसनला निवडले आहे. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना संधी दिली आहे. तर अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा आणि कृणाल पांड्याचा समावेश करण्यात आला आहे.  वेगवान गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह याच्यासह आवेश खान, मोहम्मद सिराज, मयंक यादव आणि हर्षित राणाला संधी दिली आहे. 





संजय मांजरेकरांनी निवडलेला संघ पुढील प्रमाणे आहे-


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, आवेश खान, मोहम्मद सिराज, मयंक यादवं, हर्षित राणा 






विश्वचषकासाठी पात्र ठरलेले 20 संघ...


अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा 


गटवारी 


अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ


भारतीय संघाचे वेळापत्रक


5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा 


संबंधित बातम्या:


षटकार पाहून मिस्ट्री गर्ल अवाक्...; रिॲक्शनने नेटकरी प्रेमात, ओळख पटताच सर्वांना शॉक, Video


जसप्रीत बुमराहला भारत सोडून कॅनडाला जायचे होते...; पत्नी संजनाला सांगितली भावनिक स्टोरी


Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video