IPL 2024: KKR vs PBKS: पंजाब किंग्जनं टॉस जिंकला, पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय

IPL 2024: KKR vs PBKS: कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता आणि पंजाबचा सामना रंगणार आहे.

मुकेश चव्हाण Last Updated: 26 Apr 2024 11:17 PM
पंजाबचा ऐतिहासिक विजय

पंजाबने 262 धावांचा यशस्वी पाठलाग केला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा रनचेस

शशांक सिंहचं अर्धशतक

शशांक सिंह यानं 23 चेंडूमध्ये ठोकलं अर्धशतक

सामाना रोमांचक स्थितीमध्ये

पंजाबला विजयासाठी 16 चेंडूमध्ये 26 धावांची गरज

जॉनी बेयरस्टोचं शानदार शतक

पंजाबचा सलामी फलंदाज जॉनी बेयरस्टो यानं कोलकात्याविरोधात शानदार शतक ठोकलं. त्याचं आयपीएलमधील हे दुसरं शतक होय.

पंजाबला दुसरा धक्का

रायली रुसोच्या रुपाने पंजाबला दुसरा धक्का बसलाय. रुसो 26 धावा काढून बाद जाला. पंजाब दोन बाद 178 धावा

पंजाबकडून जोरदार प्रत्युत्तर

कोलकात्यानं दिलेलल्या 262 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. प्रभसिमरन यानं 20 चेंडूत अर्धशतक ठोकलं. तर जॉनी बेयरस्टो 37 चेंडूत 88 धावांवर खेलत आहे. पंजाब एक बाद 173 धावा

कोलकात्याची 260 धावांपर्यंत मजल

कोलकात्याची 260 धावांपर्यंत मजल

पाचवा धक्का

रिंकू सिंह चार चेंडूत पाच धावा काढून बाद

कोलकात्याला चौथा धक्का

श्रेयस अय्यर बाद.. कोलकात्याला चौथा धक्का.. अय्यरने दहा चेंडूम्ये केल्या 28 धावा

कोलकात्याला तिसरा धक्का

आंद्रे रसेलच्या रुपाने कोलकात्याला तिसरा धक्का बसलाय. रसेल 24 धावा काढून बाद झालाय. कोलकाता तीन बाद 203 धावा

कोलकात्याला दुसरा धक्का

दोन षटकारानंतर सॅम करनचं कमबॅक... सॉल्ट 75 धावांवर बाद झालाय.. कोलकाता 2 बाद 163 धावा

कोलकात्याला पहिला धक्का

राहुल चाहरनं कोलकात्याला दिला पहिला धक्का.. सुनिल नारायण 32 चेंडूत 71 धावा काढून बाद.. कोलकाता एक बाद 138 धावा

कोलकात्याची वादळी सुरुवात

सुनील नारायण आणि फिलिप सॉल्ट यांनी पंजाबची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी 10 षटकांमध्ये 137 धावांची भागिदारी केली. 

सॉल्टचं अर्धशतक

सुनील नारायण याच्यानंतर फिलिप सॉल्ट यानेही अर्धशतक ठोकलेय. सॉल्टने 25 चेंडूत ठोकलं अर्धशतक.. कोलकात्यानं 9 षटकात बिनबाद 118 धावा केल्या.

नारायणचं अर्धशतक

सुनील नारायण यानं 23 चेंडूमध्ये ठोकलं अर्धशतक.. कोलकात्याची वादळी सुरुवात.. 7.3 षटकात बिनबाद 93 धावा

कोलकात्याची आक्रमक सुरुवात

कोलकात्यानं प्रथम फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली आहे. कोलकात्यानं 5 षटकात 70 धावांचा पाऊस पाडलाय. 

कोलकात्याची तुफानी सुरुवात

सुनील नारायण आणि फिलिप सॉल्ट यांनी वादळी सुरुवात केली आहे. पंजाबच्या गोलंदाजांचा त्यांनी समाचार घेतलाय. 3 षटकांमध्ये कोलकात्यानं 38 धावा केल्यात.

कोलकाताची टीम, कुणाला संधी, कुणाला डच्चू

कोलकाताची टीम 


फिल सॉल्ट, सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, डी. चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रमणदीप सिंग





पंजाब किंग्जनं टॉस जिंकला, पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय, पंजाबची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्जचा संघ : जॉनी बेयरस्टो, आर. रुसो, सॅम करन (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंह, आशुतोष शर्मा, एच ब्रार, कगिसो रबाडा, हर्षल पटेल, आर. चहर, अर्शदीप सिंग





नरेनच्या नावावर सर्वात जास्त धावा-

केकेआरचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन सध्या चांगल्या फॉर्मात आहे. नरेनच्या प्रत्येक सामन्यात स्फोटक फलंदाजी केली आहे. 7 सामन्या 176.54 च्या स्ट्राइक रेटने एकुण 286 धावा केल्या आहेत. 

पंजाबचं ट्विट

शिखर धवन आजचा सामना मुकणार-

दुखापतग्रस्त शिखर धवन कोलकाताविरुद्धचा आजचा सामनाही मुकण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यातही सॅम कुरन कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसेल. 

केकेआरचं ट्विट

खेळपट्टी कशी असेल?

कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर सातत्याने मोठी धावसंख्या उभारली जात आहे. या हंगामात संघांनी अनेकवेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय संघांनी 200 धावांचा पाठलागही केला आहे. त्यामुळे या मैदानावर पुन्हा एकदा उच्च धावसंख्येचा सामना पाहायला मिळणार आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय संघ घेताना बघायला मिळेल. आतापर्यंत या मैदानावर झालेल्या 90 टी-20 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 37 वेळा विजय मिळवला आहे, तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने 53 वेळा विजय मिळवला आहे.

कोणत्या संघाचं वर्चस्व?

या हंगामात कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजही उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर कोलकाता नाइट रायडर्सला ईडन गार्डन्सवर पराभूत करणे हे विरोधी संघांसाठी मोठे आव्हान आहे. याशिवाय, आतापर्यंत दोन्ही संघ 32 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये केकेआरने 21 वेळा, तर पंजाब किंग्जने 11 वेळा विजय मिळवला आहे. अशाप्रकारे, आकडेवारी आणि सध्याचा फॉर्म पाहिल्यास केकेआर विजयाचा प्रबळ दावेदार आहे.

केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार?

फिल सॉल्ट आणि सुनील नरेन हे कोलकाता नाईट रायडर्सचे सलामीवीर असू शकतात. याशिवाय आंक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल आणि रमणदीप सिंग हे फलंदाज प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात. तर वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती हे गोलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात.

पंजाब किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

सॅम कुरन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.

कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

चेन्नई, दिल्ली, गुजरातमध्ये चुरस; टॉप 4 मध्ये कोण?

पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ: 

सॅम कुरन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत सिंग भाटिया, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर, विद्वत कवेरप्पा, अथर्व तायडे, शिवम सिंग, ऋषी धवन, जॉनी बेअरस्टो, नॅथन एलिस, तनय त्यागराजन, शिखर धवन, ख्रिस वोक्स, सिकंदर रझा, प्रिन्स चौधरी, विश्वनाथ सिंग

कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ: 

फिलिप सॉल्ट, सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, वेंकटेश लायर, श्रेयस लायर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानउल्ला गुरबाज, अल्लाह गझनफर, साकिब हुसेन, शेरफान रदरफोर्ड, चेतन साकारिया, नितीश राणा, श्रीकर भारत, दुष्मंथा चमीरा

पार्श्वभूमी

IPL 2024: Kolkata Knight Riders vs Punjab Kings: आज कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात लढत होणार आहे. हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.