LSG vs KKR : कोलकाताचा लखनौवर दणदणीत विजय, गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप

LSG vs KKR : आयपीएलमध्ये आज 54 व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जाएंटस आमने सामने येणार आहेत.

युवराज जाधव Last Updated: 05 May 2024 11:20 PM
लखनौचा 98 धावांनी पराभव

कोलकाता नाईट रायडर्सनं 6 विकेटवर 235 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यात लखनौ सुपर जाएंटसला अपयश आलं. लखनौचा संघ 137 धावांवर बाद झाला.

निकोलस पूरन बाद, आंद्रे रसेलनं घेतली दुसरी विकेट

 निकोलस पूरन 10 करुन बाद झाला आहे. आंद्रे रसेलनं दुसरी विकेट घेतली.

लखनौ सुपर जाएंटसला चौथा धक्का, मार्कस स्टॉयनिस बाद

कोलकाता नाईट रायडर्सनं लखनौला चौथा धक्का दिला आहे. लखनौ सुपर जाएंटसचा प्रमुख फलंदाज मार्कस स्टॉयनिस 36 धावा करुन बाद झाला.

लखनौला दुसरा धक्का केएल राहुल बाद

लखनौचा कॅप्टन केएल. राहुल 25 धावा करुन बाद झाला आहे. हर्षित राणानं त्याची विकेट घेतली.

कोलकाताचा लखनौला पहिला धक्का

कोलकातानं लखनौला पहिला धक्का दिला असून असीन कुलकर्णी 9 धावांवर बाद झाला.  

कोलकाताचा 235 धावांचा डोंगर

कोलकाता नाईट रायडर्सनं 20 ओव्हरमध्ये 6 विकेटवर 235 धावा केल्या आहेत. 

कोलकाताला चौथा धक्का, अंगकृष रघुवंशी बाद

कोलकाता नाईट रायडर्सला 171 धावांवर चौथा धक्का बसला आहे. अंगकृष रघुवंशी 32 धावांवर बाद केलं.

आंद्रे रसेल बाद, नवीन-उल-हकला दुसरं यश

आंद्र रसेल 12 धावा करुन बाद झाला. त्याला नवीन-उल-हकनं बाद केलं. 

कोलकाताला दुसरा धक्का, सुनील नरेन 81 धावांवर बाद 

रवि बिश्नोईनं कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर सुनील नरेन याला 81 धावांवर बाद केलं. 

कोलकाता नाईट रायडर्सच्या 100 धावा पूर्ण

कोलकाता नाईट रायडर्सनं 9 ओव्हर होईपर्यंत 100 धावांचा टप्पा पूर्ण केलाय. कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवर सुनील नरेननं अर्धशतक झळकावलं आहे. त्यानं आयपीएल करिअरमध्ये यंदा सर्वाधिक धावा केल्या आहेत.  

सुनील नरेन अर्धशतकाच्या उंबरठ्यावर

सुनील नरेन अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्यानं 23 बॉलमध्ये 42 धावा केल्या आहेत. 

LSG vs KKR : नवीन-उल -हककडून कोलकाताला पहिला धक्का

 लखनौच्या नवीन-उल-हकनं कोलकाता नाईट रायडर्सला पहिला धक्का दिला. फिल सॉल्ट 32 धावांवर बाद झाला. कॅप्टन केएल. राहुलनं कॅच घेत पहिला धक्का कोलकाताला दिला.

कोलकाता नाईट रायडर्सची आक्रमक सुरुवात 

लखनौ सुपर जाएंटसनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर पहिल्यांदा बॉलिंगला उतरलेल्या कोलकातानं आक्रमक सुरुवात केली आहे. त्यांनी 4 ओव्हरमध्ये 57 धावांपर्यंत मजल मारलीय.

कोलकातापुढं लखनौ वरचढ

कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जाएंटस आयपीएलमध्ये आतापर्यंत चारवेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये लखनौनं तीन वेळा मॅच जिंकली आहे. तर, कोलकातानं एकदा मॅच जिंकली आहे.

कोलकातापुढं लखनौ वरचढ

कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जाएंटस आयपीएलमध्ये आतापर्यंत चारवेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये लखनौनं तीन वेळा मॅच जिंकली आहे. तर, कोलकातानं एकदा मॅच जिंकली आहे.

के.एल. राहुलनं टॉस जिंकला, पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय

के.एल. राहुलनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला.

लखनऊ सुपर जाएंटसचा संघ :

लखनऊ सुपर जाएंटसचा संघ : केएल राहुल(विकेटकीपर /कॅप्टन), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, एश्टन टर्नर, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, रवि बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, यश ठाकूर

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ : फिलीप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर (कॅप्टन), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिशेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा

पार्श्वभूमी

IPL 2024 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders, LSG vs KKR : आयपीएलमध्ये आज 54 व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि  लखनौ सुपर जाएंटस आमने सामने येत आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत असणाऱ्या दोन संघाची लढत आज होत आहे. आजच्या मॅचमध्ये श्रेयस अय्यरची टीम  विजय मिळवणार की  के.एल. राहुलची टीम विजय मिळवणार हे पाहावं लागेल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.