IPL 2024 AB de Villiers RCB: सनरायझर्स हैदराबादचा (SRH) आठ विकेटने पराभव करत  कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) फायनलचे तिकिट मिळवले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या क्वालिफायर 1 सामन्यात कोलकात्याने शानदार कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली. हैदराबादने दिलेले 160 धावांचे माफक आव्हान कोलकाताने आठ विकेट्स आणि 38 चेंडू राखून सहज पार केले. 


हैदराबादचा संघ आता 24 मे 2024 रोजी क्वालिफायर 2 सामना खेळणार आहे. राजस्थान आणि आरसीबी यांच्यातील विजेत्या संघासोबत हैदराबाद चेन्नईमध्ये भिडणार आहे. क्वालिफायर 2 चा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. बंगळुरुला पाठिंबा देण्यासाठी दक्षिण अफ्रिका आणि बंगळुरुचा माजी खेळाडू एबी डिव्हिलीयर्स (AB de Villiers ) भारतात दाखल झाला आहे.याचदरम्यान त्याने कोलकाता आणि हैदराबाद यांचा सामना होण्याआधीच एक भविष्यवाणी केली होती. 


एबी डिव्हिलीयर्स काय म्हणाला होता?


कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात कोलकाता जिंकेल आणि राजस्थान आणि बंगळुरुच्या सामन्यात बंगळुरु विजयी होईल व कोलकाता आणि बंगळुरुमध्ये अंतिम सामना रंगेल, असं भाकित आता एबी डिव्हिलीयर्सने केलं आहे. एबी डिव्हिलीयर्सने भाकित केल्यानूसार काल कोलकाताना हैदराबादविरुद्ध विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे आज राजस्थान आणि हैदराबादला पराभूत करुन कोलकाताविरुद्ध बंगळुरु अंतिम सामना खेळणार की नाही, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 
स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला संघ आरसीबी आहे, ज्याने सलग 6 सामने जिंकून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. केकेआरला अंतिम फेरीत फायदा मिळू शकतो, अंतिम सामना चेन्नईमध्ये आहे. केकेआरकडे चांगले फिरकीपटू आहेत, त्यामुळे संघ अंतिम फेरीत गेला तर त्याचा फायदा होऊ शकतो, असंही एबी डिव्हिलीयर्सने सांगितले.  


केकेआरने मारली बाजी-


हैदराबादला 19.3 षटकांत 159 धावांत गुंडाळल्यानंतर कोलकाताने 13.4 षटकांतच केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांनी तडाखेबंद अर्धशतक झळकावत संघाला विजयी केले. रहमानुल्लाह गुरबाझ आणि सुनील नरेन यांनी 20 चेंडूत 44 धावांची सलामी दिली, चौथ्या षटकात टी. नटराजनने गुस्बाझाला बाद करून ही जोडी फोडल्यानंतर सातव्या षटकात पॅट कमिन्सने नरेनला बाद केले. परंतु, यानंतर व्यंकटेश आणि श्रेयस यांनी भागीदारी करत कोलकाताला सहज विजयी केले, श्रेयसने 23, तर व्यंकटेशने 28 चेंडूंत अर्धशतक झळकावले.


हैदराबादची सुरुवात खराब -


अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. पण कोलकात्याच्या गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं दाखवून दिले. पॉवरप्लेमध्येच हैदराबादचे दिग्गज फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. 39 धावांतच हैदराबादने आपले आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. मिचेल स्टार्क,  वैभव अरोरा यांच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. पण राहुल त्रिपाठीने एकट्याने झुंज दिली. 


संबंधित बातम्या:


RCB Virat Kohli: मी रोहित शर्माच्या त्या विधानाचं समर्थन करतो...; विराट कोहलीही धावला मदतीला, बीसीसीआय दखल घेणार?


IPL 2024 Virat Kohli: दोन लोकांमुळे कोहलीची कारकीर्द 'विराट' बनली; स्वत:च व्हिडीओद्वारे केला खुलासा, नेमकं काय म्हणाला?


Jay Shah: रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे...; जय शहा यांनी सांगितली 3 आवडत्या दिग्गज क्रिकेटपटूंची नावं!