RCB vs LSG, Virat Kohli Gautam Gambhir Fight : आयपीएलच्या (IPL 2023) आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल बीसीसीआयने (BCCI) विराट कोहली (Virat Kohli), गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि नवीन-उल-हक यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लखनौच्या एकना स्टेडियमवर सोमवारी झालेल्या सामन्यादरम्यान झालेल्या वादामुळे कोहली, गंभीरसह नवीनला बीसीसीआयनं दंड ठोठावला आहे. लेव्हल 2 गुन्ह्यात अंतर्गत दोषी आढळल्याने विराट कोहली, गौतम गंभीर यांना त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तर, नवीन-उल-हकने त्याच्या लेव्हल 1 च्या गुन्ह्याअंतर्गत दोषी आढळल्याने त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के रक्कम दंड ठोठावला आहे. गंभीर, कोहली आणि नवीन यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून दंड स्वीकारला आहे.


RCB vs LSG, IPL 2023 : कोहली, गंभीरसह नवीनला कोट्यवधींचा दंड


लखनौच्या इकाना स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) पराभव केला. लखनौचा (LSG) त्यांच्याच घरच्या मैदानावर बंगळुरुकडून (RCB) 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. दरम्यान, सामन्यानंतर (LSG vs RCB Match) विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनौ संघाचा मार्गदर्शक (Lucknow Super Giants Mentor) गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.






RCB vs LSG, Kohli-Gambhir Clash : भरमैदानात कोहली आणि गंभीर एकमेकांना भिडले


लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडिअमवर (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) लखनौ आणि बंगळुरु यांच्यात सामना रंगला. हा सामना आरसीबीनं जिंकला. सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली. लखनौचा फलंदाज अमित मिश्रा, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि लखनौचे सहाय्यक प्रशिक्षक विजय दहिया यांनी हा वाद सोडवला. यानंतर कोहली लखनौचा कर्णधार केएल राहुलशी बोलतानाही दिसला. दरम्यान, हे भांडण कोणत्या कारणावरून सुरु झालं यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.


खेळाडूंना आकारण्यात आलेला दंड :


विराट कोहली : 1.07 कोटी (100 टक्के मॅच फी).


गौतम गंभीर : 25 लाख (100 टक्के मॅच फी).


नवीन-उल-हक : 1.79 लाख (50 टक्के मॅच फी).


Reason of Kohli-Gambhir Fight : कोहली-गंभीर वादाचं नेमकं कारण काय?


लखनौ विरुद्धच्या सामन्यात कोहलीला चांगलाच उत्साहात दिसला. आयपीएल 2023 मध्ये याआधी झालेल्या लखनौ विरुद्ध बंगळुरु सामन्यात लखनौनं आरसीबीचा पराभव केला होता. यावेळी आरसीबीला हरवल्यानंतर लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीर मोठ्या दिमाखात जल्लोष साजरा करताना दिसला होता. याला प्रतिसाद म्हणून लखनौला हरवल्यानंतर कोहलीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली असं बोललं जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kohli-Gambhir Clash : गौतम गंभीरसोबतच्या वादानंतर विराट कोहलीनं सोडलं मौन, म्हणाला...