IPL 2023 GT vs DC Match Preview : इंडियन प्रीमियर लीगच्या 44 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. आयपीएल 2023 च्या गुणतालिकेतील पहिल्या क्रमांकाचा संघ आणि शेवटच्या दहाव्या क्रमांकाचा संघ यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. गुजरात टायटन्स 8 सामन्यांत 6 विजय आणि 2 पराभवांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. गुजरातने मागील सामन्यात कोलकाताचा पराभव केला. 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा त्यांचा मागील सामना सात गडी राखून विजय मिळवला. 


IPL 2023 GT vs DC : गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने


दुसरीकडे, आयपीएल 2023 च्या सुरुवातीला पाच सामने गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची यंदाच्या हंगामाची सुरुवात खराब झाली. संघ दोन विजयांसह लीगमध्ये पुन्हा परतला, पण दिल्लीला त्यांच्या मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला. दिल्ली संघाने आतापर्यंत 8 सामन्यांपैकी फक्त 2 सामन्यांत विजय मिळवला असून संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ चार गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.


GT vs DC Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा 


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये गुजरात टायटन्स (GT) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) या दोन संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड असल्याचं पाहायला मिळतं. गुजरात संघाने दिल्लीविरोधातील दोन्ही सामने जिंकले आहेत तर दिल्ली संघाला एकही सामना जिंकण्यात यश मिळालेलं नाही. 


GT vs DC IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आज, 02 मे रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL Points Table 2023 : बंगळुरूकडून लखनौचा 18 धावांनी पराभव, आयपीएल पॉईंट्स टेबलची स्थिती काय पाहा...