IPL 2023, GT vs DC Match 44 : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघात सामना रंगणार आहे. गतविजेता गुजरात टायटन्स संघ यंदाही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तर दिल्ली कॅपिटल्सची हंगामाची सुरुवात खराब झाली आहे. गुजरात टायटन्सने शेवटच्या सामन्यात कोलकातावर विजय मिळवला. तर दिल्ली कॅपिटल्सला सनरायजर्स हैदराबादकडून पराभव स्वीकारावा लागला. गुजरात संघाने आतापर्यंतच्या आठ सामन्यांपैकी सहा सामने जिंकले आहेत. तर दिल्ली संघाला आठपैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत.


IPL 2023 Match 44, GT vs DC  : गुजरात आणि दिल्ली आमने-सामने


इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या हंगामात सुरुवातीला सलग पाच सामने गमावल्यानंतर दिल्ली संघ सलग दोन बॅक टू बॅक सामन्यात विजय मिळवत स्पर्धेत विजी मार्गवर परतला. मात्र, शनिवारी सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाल्याने संघाची विजयी मोहिम थोडक्यात संपली. आजच्या सामन्यात दिल्ली पुन्हा विजयी मार्गवर जाण्यासाठी गुजरात विरोधात मैदानात उतरेल.


Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये तुल्यबळ समान पाहायला मिळतो. खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो.  नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच.


GT vs DC Probable Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11


GT Probable Playing 11 : गुजरात टायटन्स


शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, विजय शंकर, आर तेवतिया, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा, नूर अहमद.


DC Probable Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स


डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, मिशेल मार्श, रिपल पटेल, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), एनरीच नॉर्टजे, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


GT vs DC Match Preview : दिल्ली विजयी मार्गावर परतणार की गुजरात वरचढ ठरणार? पाहा हेड टू हेड आकडेवारीमध्ये कुणाचं पारड जड...