IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामापूर्वी पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) संघात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळतोय. इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणाऱ्या ट्रेवर बेलिस (Trevor Bayliss) यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियु्क्ती करण्यात आलीय. आयपीएलमध्ये बेलिस यांनी सनरायजर्स हैदराबादच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभाळली आहे. महत्वाचं म्हणजे, पंजाबच्या संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचा खिताब जिंकता आला नाही. परंतु, बेलिस यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर पंजाबच्या संघाचा गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलचा खिताब जिंकण्याचं स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे. पंजाब किंग्जनं अनिल कुंबळे यांच्यासोबतचा करार न वाढवता ट्रेव्हर बेलिसला प्रशिक्षक बनवण्याचे संकेत दिले. संघाच्या मालकांच्या वतीनं असं सांगण्यात आलं की, ट्रेवरकडं प्रशिक्षणाचा चांगला अनुभव आहे आणि ते संघासाठी एक उत्तम पर्याय आहेत.


ट्वीट-


ट्रेवर बेलिस यांच्या प्रशिक्षणाखाली इंग्लंडच्या संघानं 2019 मध्ये प्रथमच एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. दरम्यान, 2012 आणि 2014 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR)नं आयपीएल विजेतेपद जिंकलं होतं,  तेव्हा ट्रेवर बेलिस संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग होते. बेलिस हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे आहेत. पंजाबचे माजी मु्ख्य प्रशिक्षक आणि भारताचे दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. ज्यामुळं फ्रँचायझीनं त्याच्यासोबतचा करार संपवला. 


अनिल कुंबळेंच्या प्रशिक्षणाखाली पंजाबचं खराब प्रदर्शन
अनिल कुंबळेंच्या प्रशिक्षणाखाली पंजाबच्या संघानं 42 सामने खेळले आहेत. यापैकी 18 सामन्यात पंजाबच्या संघानं विजय मिळवलाय. तर, 22 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. यातील दोन सामने अनिर्णित ठरले. 


पंजाबच्या संघाची आतापर्यंतची कामगिरी
आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामापासून भाग घेत असलेला हा संघ पूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब म्हणून ओळखला जात होता. पंजाब किंग्सनं 2014 च्या अंतिम सामन्यासह केवळ दोनदाच प्ले-ऑफमध्ये प्रवेश केलाय. 2022 च्या आयपीएल लिलावात पंजाबनं लियाम लिव्हिंगस्टोन, कागिसो रबाडा, शिखर धवन या खेळाडूंना खरेदी केलं होतं. तसेच, लिलावापूर्वी पंजाब किंग्जनं मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंह यांना कायम ठेवलं होतं. अर्शदीप सिंह आयपीएल 2022 मध्ये चर्चेत आला. तर, कर्णधार मयंकर अग्रवाल संघर्ष करताना दिसला.


हे देखील वाचा-