LLC 2022: लीजेंड्स लीग क्रिकेटच्या (Legends League Cricket 2022) दुसऱ्या हंगामाला उद्यापासून (17 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. यापू्र्वी आज कोलकाताच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) एका खास सामन्याच आयोजन केलं जाणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स (India Maharajas vs World Giants) यांच्यात आज महामुकाबला खेळला जाणार आहे. दोन्ही संघात जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे. यामुळं हा सामना अधिक रोमांच होण्याची शक्यता आहे.
भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) इंडिया महाराजा संघाचं नेतृत्व करणार आहे. यासह माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांसारखे स्टार खेळाडू अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळतील. दुसरीकडं दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू जॅक कॅलिस (Jacques Kallis) वर्ल्ड जायंट्सच्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहेत. वर्ल्ड जायंट्सच्या संघात इयॉन मॉर्गन मुथय्या मुरलीधरन आणि डेल स्टेन यांसारख्या स्टार क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
कधी, कुठं सामना पाहायचा?
लीजेंड्स लीग क्रिकेटचा खास सामना आज (16 सप्टेंबर) संध्याकाळी 7.30 वाजता कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळला जाणार आहे. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.
संभाव्य संघ
इंडिया महाराजा:
वीरेन्द्र सहवाग (कर्णधार), एस बद्रीनाथ, युसूफ पठान, मोहम्मद कैफ, पार्थिव पटेल (विकेटकीपर), इरफान पठान, हरभजन सिंह, एस श्रीसंथ, प्रज्ञान ओझा, आरपी सिंह, जोगिंदर शर्मा.
वर्ल्ड जायंट्स:
जैक्स कैलिस (कर्णधार), शेन वॉटसन, इयॉन मोर्गन, लेंडल सिमन्स, केविन ओब्रायन, डेनियल विटोरी, मॅट प्रायर, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, ब्रेट ली, मिचेल जॉनसन.
सामन्यावर पावसाचं सावट
सध्या संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच कोलकाता येथे शुक्रवारी संध्याकाळी पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. ज्यामुळं इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यातील सामन्यावर संकट येऊ शकतं.
हे देखील वाचा-