Mumbai Indians New Head Coach: सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाची ताकद आणखी वाढणार आहे. दरम्यान, महिला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवल्यानंतर मुंबईच्या संघानं दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू मार्क बाऊचरची (Mark Boucher) संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केलीय. बाऊचरनं काही दिवसांपूर्वी आगामी टी-20 विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. 


ट्वीट-



मार्क बाऊचर काय म्हणाला?
मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर मार्क बाऊचर म्हणाला की, "एमआयच्या मुख्य प्रशिक्षकपद नियुक्ती होणं, माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. फ्रँचायझी म्हणून त्यांचा इतिहास आणि कामगिरीनं  जगभरात खेळणाऱ्या अन्य फ्रँचायझीपेक्षा अधिक यशस्वी असल्याचं सिद्ध केलंय. मी आव्हानाची वाट पाहतो आणि निकालांच्या गरजेचा आदर करतो. हे उत्कृष्ट नेतृत्व आणि खेळाडू असलेले एक मजबूत युनिट आहे. मी या गतिमान घटकाशी जोडण्यासाठी उत्सुक आहे.'


आकाश अंबानीकडून मार्क बाऊचरचं स्वागत
"मुंबई इंडियन्सच्या संघात मार्क बाऊचरचं स्वागत करताना आनंद होत आहे.मैदानावरील त्याच्या सिद्ध कौशल्यामुळं आणि प्रशिक्षक म्हणून आपल्या संघाला अनेक विजय मिळवून देण्यासह मार्क एमआयसाठी मोठं योगदान देतील आणि त्याचा वारसा पुढे नेईल."


प्रशिक्षक म्हणून बाऊचरची कामगिरी
दक्षिण आफ्रिकेचं प्रशिक्षक असताना बाउचरचे आकडे उत्कृष्ट राहिले आहेत. 2019 मध्ये त्यांनी आपल्या देशाचे प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्याच्या प्रशिक्षणाखाली संघानं 10 कसोटी सामने जिंकले. ज्यात या वर्षी जानेवारीत भारताविरुद्ध 2-1 कसोटी मालिका विजयाचा समावेश आहे. संघ सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही बाऊचरच्या प्रशिक्षकपदाखाली संघानं आतापर्यंत 12 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत.


एमआय कॅप टाऊनच्या कोचिंग स्टाफची घोषणा
मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये समाविष्ट असलेल्या एमआय केपटाऊन फ्रँचायझीच्या प्रशिक्षकांची घोषणा करण्यात आलीय.ऑस्ट्रेलियाच्या माजी स्टार फलंदाजी सायमन कॅटिच यांच्यावर एम आय केपटाऊन संघाच्या मुख्यप्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. तर, दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज हाशिम अमला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. याशिवाय, मुंबई इंडियन्सचे सध्याचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पेमेंट हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून अतिरिक्त भूमिका सांभाळतील आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि गृह प्रशिक्षक रॉबिन पीटरसन संघाचे सरव्यवस्थापक असतील.


हे देखील वाचा-