IPL 2023: आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी (IPL 16) येत्या 23 डिसेंबरला कोची (Kochi) येथे मिनी ऑक्शन (IPL 2023 Mini Auction) होणार आहे. या ऑक्शनमध्ये एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली. त्यापैकी बोर्डानं 405 खेळाडूंचं नाव शार्टलिस्ट केलं. या ऑक्शनपूर्वी प्रत्येक फ्रँचायझींनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडं (BCCI) सोपवली. दरम्यान, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेला चेन्नईचा संघ (CSK) मिनी ऑक्शनमध्ये माजी अनुभवी ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्होच्या (Dwayne Bravo) रिप्लेसमेन्टच्या शोधात असेल. अशावेळी संघाची नजर इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर सॅम करनवर (Sam Curran) असेल, जो आधीही संघाचा भाग होता.


सॅम करनचा संघात समावेश करण्याचा सीएसकेचा प्रयत्न
सॅम करननं 2022च्या टी-20 विश्वचषकातील त्याच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर प्लेअर ऑफ द टूर्नामेन्टचा खिताब जिंकला. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्ज ऑक्शनमध्ये सॅम करनवर मोठी बोली लावून त्याचा संघात समावेश करण्याचा प्रयत्न करेल. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीलाही करनची खेळण्याची शैली आवडते. सॅम करननं पुन्हा चेन्नई सुपर किंग्जच्या संघात सामील व्हावे, अशी त्याची इच्छा आहे. 


ऑक्शनमध्ये सॅम करनवर लागणार मोठी बोली
सॅम करन याआधी चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल खेळला आहे. सॅम डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. एवढंच नव्हेतर, तो खालच्या फळीत वेगानं धावाही करतो. ज्यामुळं चेन्नईचा संघ त्याला ऑक्शनमध्ये खरेदी करू इच्छितो. सॅमची विश्वचषकातील कामगिरी पाहता आता चेन्नईसह अनेक फ्रँचायझी सॅमला आपल्या संघात सामील करण्यासाठी मोठी बोली लावण्याची शक्यता आहे. 


सॅम करनची मूळ किंमत
आयपीएल 2023 च्या ऑक्शनमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. सॅम करन, रिली रोसो, केन विल्यमसन, कॅमेरॉन ग्रीन, जेसन होल्डर, बेन स्टोक्स, टॉम बॅंटन, निकोलस पूरन, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिल्ने, आदिल रशीद, ट्रॅव्हिस हेड, रॅसी व्हॅन डर डसेन, जिमी नीशम, ख्रिस लिन, जेमी ओव्हरटन आणि टायमल मिल्ससारख्या खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे.


चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाकडं किती रक्कम शिल्लक?
चेन्नई संघानं ख्रिस जॉर्डन आणि अॅडम मिल्नेसारखे खेळाडू सोडले आहेत. आता टीमकडे एकूण 20.45 कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे. त्याच वेळी, संघाकडे एकूण 2 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.


हे देखील वाचा-