Lionel Messi with Fifa trophy : 18 डिसेंबर 2022 रोजी अवघ्या जगभरानं एक अत्यंत रोमहर्षक असा फुटबॉल सामना पाहिला. फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना (FRA vs ARG) या फिफा विश्वचषक 2022 (Fifa WC) च्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने विजय मिळवला आणि संघाचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीला (Lionel Messi) अखेर वर्ल्ड कप मिळाला. 35 वर्षीय मेस्सीनं फुटबॉल कारकिर्दीत अनेक मोठ-मोठे पुरस्कार मिळवले पण विश्वचषक न मिळाल्या खंत त्याच्या मनात होती, जी अखेर पूर्ण झाली आणि एक मोठं स्वप्न मेस्सीचं पूर्ण झालं. ज्यामुळे विजयानंतर झोपताना देखील मेस्सीने ट्रॉफी सोडली नसून ट्रॉफी कुशीत घेऊनच तो झोपला. मेस्सीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत एक  पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मेस्सीनं शुभ दिवस लिहिलं असून सोबत ट्रॉफी बरोबरचे फोटो शेअर केले आहेत.  या पोस्टवर जगभरातील मेस्सी चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 


मेस्सीची इन्स्टाग्राम पोस्ट -






अर्जेंटिनाचा रोमहर्षक विजय


फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना (France vs Argentina) फायनलची सुरुवात तशी अर्जेंटिनाकडून झाली 90 मिनिटांच्या सामन्यात 79 मिनिटांपर्यंत अर्जेटिना 2-0 अशा उत्तम आघाडीवर होते. पण त्यानंतर फ्रान्सच्या कायलिन एम्बाप्पेनं (kylian mbappe) अद्भुत खेळ दाखवत हॅट्रिक केली. मेस्सीनंही झुंज देत आणखी एक गोल केला आणि सामना 3-3 अशा बरोबरी आला, ज्यामुळे पेनल्टी शूटआऊट (Penalty Shootout) झालं. ज्यात अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टीनेज आणि संघानं अप्रतिम कामगिरी कर त 4-2 अशा फरकानं सामना जिंकला आणि अखेर मेस्सीच्या अर्जेंटिनानं फिफा वर्ल्ड कप जिंकला.  


हे देखील वाचा-