एक्स्प्लोर

IPL 2023 Preview : दिल्ली अन् लखनौमध्ये काटें की टक्कर, कोण मारणार बाजी?

Lucknow Super Giants vs Delhi Capitals : लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या एक एप्रिल रोजी लढत होणार आहे.

IPL 2023 Match 3 Preview, Lucknow Super Giants vs Delhi Capitals : लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक एप्रिल रोजी लढत होणार आहे. दोन्ही संघाचा हा सामना लखनौच्या इकाना स्टेडिअमवर रंगणार आहे. मागील काही आयपीएलमध्ये दिल्लीने दमदार कामगिरी केली आहे. 2019, 2020 आणि 2021 मध्ये दिल्लीने लागोपाठ प्लेऑफमध्ये स्थान पटकावलेय. 2020 मध्ये दिल्लीचा संघ उप विजेता होता. 2022 मध्ये दिल्ली पाचव्या क्रमांकावर होता. दुसरीकडे लखनौ संघाने पदार्पणातच दमदार कामगिरी केली होती. लखनौच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे, एकापेक्षा एक सरस खेळाडूमुळे लखनौ संघ मजबूत दिसत आहे. 

राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघ उतरणार मैदानात -

2022 मध्ये लखनौ संघाने पहिल्यांदा आयपीएलमध्ये पदार्पण केलेय. पहिल्याच आयपीएल हंगामात लखनौ संघाने सर्वांना प्रभावित केले. राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघाने प्लेऑफपर्यंत प्रवास केला होता. आता नव्या हंगामात नवी तयारीसह लखनौ संघ मैदानात उतरेल.. पण पहिल्या दोन सामन्यात दोन अनुभवी खेळाडूशिवाय लखनौ संघ मैदानात उतरणार आहे. राहुलसोबत सलामीची जबाबदारी पार पाडणारा क्विंटन डी कॉक आणि वेगवान गोलंदाज मोहसिन खान पहिल्या दोन सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. गेल्या हंगामात या दोन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. क्विंटन डी कॉक सध्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. दक्षिण आफ्रिका संघाने त्याला अद्याप रिलिज केलेले नाही. तर मोहसिन खान अद्याप पूर्णपणे फिट नाही. अशात लोकेश राहुल याच्यासोबत सलामीला निकोलस पूरन उतरण्याची शक्यता आहे. मिनी ऑक्शनमध्ये निकोलस पूरन याला लखनौ संघाने 16 कोटी रुपयात खरेदी केले होते. लखनौ सुपर जायंट्स संघात तीन प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहेत. क्रृणाल पांड्याशिवाय  मार्कस स्टॉयनिस आणि रोमारियो शेफर्ड यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. त्याशिवाय गोलंदाजीत  आवेश खान याच्यासोबत मार्क वूड वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. तर फिरकी गोलंदाजीची धुरा रवी बिश्नोई याच्या खांद्यावर असेल. रवी बिश्नोई याने गेल्या हंगामात सर्वांनाच प्रभावित केले होते. 

लखनौ सुपर जायंट्स टीम - 

केएल राहुल (कर्णधार), आवेश खान, आयुष बडोनी, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), के गौतम, दीपक हुड्डा, प्रेरक मांकड, काइल मेयर्स, अमित मिश्रा, मोहसिन खान, नवीन उल हक, क्रुणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), रवी बिश्नोई, डेनियल सॅम्स, करण शर्मा, रोमारियो शेफर्ड, मार्कस स्टॉयनिस, स्वप्निल सिंह, जयदेव उनादकट, मनन वोहरा, मार्क वूड, मयंक यादव, यश ठाकुर, युद्धवीर सिंह 

ऋषभ पंतची कमी जाणवणार का?

डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघ तुल्यबळ वाटतोय. वॉर्नर स्वत: विस्फोटक फलंदाजी करतो.. त्याशिवाय मिचेल मार्शही सध्या लयीत आहे. त्याशिवाय रिली रोसो, रोवमन पॉवेल आणि सरफराज खान यासारखे हार्ड हिटर दिल्लीच्या ताफ्यात आहेत. त्याशिवाय अक्षर पटेलसारखा तगडा अष्टपैलू खेळाडू संघाला अधिक संतुलीत करतो. गोलंदाजीत मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि चेतन सकारिया यांच्यासारखे भारतीय गोलंदाज आहेत. लखनौ विरोधात दिल्लीच्या संघाचे पारडे जड दिसतेय. दिल्ली कॅपिटल्स संघाचा नियमीत कर्णधार ऋषभ पंत यंदाच्या हंगामासाठी उपलब्ध नाही. त्याजागी डेविड वॉर्नरकडे दिल्लीची धुरा सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या जागी पश्चिम बंगालचा विकेटकीपर अभिषेक पोरेल याला सामील करण्यात आलेय. एनरिक नॉर्किया आणि लूंगी एनगिडी पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत... ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत. लवकरच ते दिल्लीच्या संघासोबत जोडले जाणार आहेत. कागदावर दिल्लीचा संघ मजबूत दिसतोय. 

दिल्लीच्या ताप्यात कोण कोण? 

रिली रोसो, मनीष पांडे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, फिल साल्ट, डेविड वार्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश ढुल, मिशेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्किया, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्ताफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विक्की ओस्टवाल, अभिषेक पोरेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget