Kolkata Knight Riders Auction Strategy 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 16व्या हंगामासाठी (IPL 2023) 23 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. लिलावासाठी एकूण 404 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे या लिलावासाठी 7.05 कोटी रुपये असून ते या लिलावात एकूण 11 खेळाडू खरेदी करू शकतो. पण फ्रेंचायझीकडे केवळ 7.05 कोटी रुपये  असल्याने त्यांची रणनीती कशी असेल ते जाणून घेऊ... 


कोलकाता नाईट रायडर्सला सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका सलामीवीर आणि एका मधल्या फळीतील फलंदाजाची सर्वाधिक गरज आहे. तसंच दोन भारतीय आणि एका विदेशी वेगवान गोलंदाजाची संघाला गरज आहे. संघाकडे सध्या रहमानउल्ला गुरबाज आणि व्यंकटेश अय्यर हे दोन सलामीवीर आहेत. त्याचवेळी फिरकी विभागात सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि अनुकुल रॉय उपस्थित आहेत. वेगवान गोलंदाजीत शार्दुल ठाकूर, उमेश यादव, टिम साऊदी आणि लॉकी फर्ग्युसन हे आहेत.


'या' खेळाडूंना घेऊ शकतात विकत


या मिनी लिलावात केकेआर ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ख्रिस लिनला खरेदी करू शकते. लिनची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. लिन याआधी बराच काळ केकेआरकडून खेळला आहे. याशिवाय केकेआर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनवर सलामीवीर म्हणून बाजी मारू शकतो. तसंच वेगवान गोलंदाजीमध्ये, फ्रँचायझी इंग्लंडच्या रीस टोप्ले आणि वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलवर दाव लावू शकतात. टोप्लेची मूळ किंमत 75 लाख आहे आणि कॉट्रेलची मूळ किंमत 50 लाख आहे. अनकॅप्ड खेळाडूंमध्ये, केकेआर केएस भरत, प्रियम ​​गर्ग, एन जगदीसन आणि अक्षदीप नाथ सारख्या युवा खेळाडूंना खरेदी करू शकते.


आगामी मिनी ऑक्शनपूर्वी केकेआरचा संघ- श्रेयस अय्यर (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नितीश राणा, आंद्रे रस्सेल, रिंकू सिंह, वेंकटेश अय्यर, वरुण चक्रवर्ती, लॉकी फर्ग्यूसन, सुनील नारायण, हर्षित राणा, अनुकुल रॉय, टिम साउदी, शार्दुल ठाकुर, उमेश यादव. 


आयपीएल 2023 पूर्वी या खेळाडूंना केलं रिलीज- पॅट कमिन्स, सॅम बिलिंग्ज, अॅलेक्स हेल्स, आरोन फिंच, मोहम्मद नबी, चमक करुणारत्ने, अजिंक्य रहाणे, अमन खान (ट्रेड), शिवम मावी, अभिजीत तोमर, अशोक शर्मा, बाबा इंद्रजीत, प्रथम सिंग, रमेश कुमार, रसिक सलाम, शेल्डन जॅक्सन .


हे देखील वाचा-