Virat Kohli and Kylian Mbappe Connection : फिफा विश्वचषक 2022 च्या (Fifa World Cup 2022) अंतिम सामन्यात फ्रान्सला अर्जेंटिनाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. ज्यामुळे एका अत्यंत रोमहर्षक सामन्यात फ्रान्सचा पराभव झाला आणि त्याचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक विजयाचं स्वप्न भंगलं... पण फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एम्बाप्पेने सामन्यात एकहाती झुंज देत सर्वांचीच मनं जिंकली, त्यानं स्पर्धेतही सर्वाधिक गोल केले आणि गोल्डन बूट जिंकला.. त्यामुळं सर्वोत्तम खेळ करुनही एम्बाप्पे वर्ल्ड कप जिंकू न शकल्याने नेटकऱ्यांना विराट आठवला आणि दोघांमधील खास किस्मत कनेक्शन मीम्सच्या माध्यमातून नेटीजन्सनी समोर आणलं...


ज्याप्रमाणे एम्बाप्पे याने संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ दाखवत गोल्डन बूट पटकावला, तशी कामगिरी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 2014 आणि 2016 टी-20 वर्ल्डकपमध्ये केली होती. दोन्ही वेळी 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा किताब त्यानं पटकावला होता, पण तेव्हाही भारतीय संघाला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं. ज्यामुळे फ्रान्सच्या पराभवानंतर लोकांनी विराट कोहली आणि एम्बाप्पे यांच्यातील नशीबातं खास कनेक्शन मीम्समधून समोर आणलं. चाहत्यांनी कोहली आणि एम्बाप्पेची बऱ्याच गोष्टींमध्ये तुलना केली, याच संबधित काही खास मीम्स पाहू.... 





19.5 and 19.6 Sixes from Virat Kohli.
80' and 81' Goals from Mbappe.

The erupted moments of sports in 2022.#Mbappe #FIFAWorldCup pic.twitter.com/GC5hYVShG6


— Tony (@five_wides) December 18, 2022



















एम्बाप्पेची दमदार हॅट्रिक


विशेष म्हणजे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कायलिन एम्बाप्पे यानं सलग तीन गोल करत दमदार अशी हॅट्रिक केली. ज्यामुळे फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये 1966 नंतर पहिल्यांदाच हॅट्रिकची नोंद झाली. कायलिनच्या या कामगिरीनंतर यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल त्याच्याच नावावर झाले. ज्यामुळं 8 गोल्स स्पर्धेत करत तो गोल्डन बूटचा मानकरी ठरला. त्यानं मेस्सीला (7 गोल) मात दिली.


हे देखील वाचा-