IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाच (KKR) नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) केएल राहुल (KL Rahul) त्याचा आवडता कर्णधार असल्याचं सांगितलं आहे. केएल राहुलचा शांत स्वभाव आणि मैदानावर निर्णय घेण्याची सहजता त्याला एक उत्कृष्ट कर्णधार बनवतो, असं श्रेयस अय्यरनं म्हटलंय. केएल राहुल यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जॉयंट्स संघाचं नेतृत्व करणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौचा संघ कशी कामगिरी करतो? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
श्रेयस अय्यर म्हणाला की, "केएल राहुलच्या नेतृत्वात खेळताना छान वाटतं. प्रथमता तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तो मैदानावर आणि संघाच्या मिटिंगमध्ये ज्या प्रकारचा आत्मविश्वास आणतो आणि खेळाडूंना ज्या प्रकारचा पाठिंबा देतो ते अतुलनीय आहे. तो खूप शांत असतो आणि मैदानावर अतिशय सहजतेनं निर्णय घेतो. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणे मला खूप आवडते, असंही श्रेयस अय्यरनं म्हटलंय.
महत्वाचं म्हणजे, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलनं एकदिवसीय मालिकेचे नेतृत्व केले होतं. श्रेयस अय्यर या मालिकेचा एक भाग होता. या मालिकेत केएल राहुलनं अय्यरला तीन षटके टाकायला दिली. यावर श्रेयस अय्यरनं आपलं मत मांडलंय. आतापर्यंत कोणत्याही कर्णधारानं त्याला गोलंदाजी करण्यास सांगितलं नाही. परंतु, केएल राहुल माझ्या हातात चेंडू सोपावला, त्यामुळं मी म्हणू शकतो की तो माझा आवडता कर्णधार आहे, असं श्रेयस अय्यरनं म्हटलंय.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज एकमेकांशी भिडणार आहेत. महेंद्रसिंह धोनी गेल्या अनेक हंगामापासून चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करीत आहे. तर, श्रेयस अय्यर पहिल्यांदाच कोलकाताच्या कर्णधारपदाची जबाबदारी संभाळणार आहे.
हे देखील वाचा-
- ISL Final : इंडियन सुपर लीग 2021-22 मध्ये हैदराबाद एफसी विजय, केरळा ब्लास्टर्सचं विजयाचं स्वप्न पुन्हा तुटलं
- FIH Pro League hockey: भारतीय हॉकी संघाचा शानदार विजय, अर्जेंटिनाला 4-3 नं नमवलं
- IPL: एका षटकात टाकले 10 चेंडू, या दोन गोलंदाजाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha