Virat Kohli IPL Records : मागील दोन वर्षांपासून विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पण एक काळ असा होता, विराट कोहली धावांचा पाऊस पाडत होता. 2016 मध्ये विराट कोहलीने तर कमालच केली होती. या वर्षात विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा राखला होताच, शिवाय आयपीएलमध्येही भन्नाट कामगिरी केली होती.  या हंगामात विराट कोहलीने केलेल्या कामगिरीची अद्याप कोणत्याही खेळाडूला बरोबरीही करता आलेली नाही. स्व:त विराट कोहलीही तशी कामगिरी करु शकलेला नाही. 2016 च्या हंगमात विराट कोहलीने आयपीएलमध्ये चार मोठे विक्रम केले आहेत. हा विक्रम इतर खेळाडूंना मोडणं कठीण आहे. पाहूयात विराट कोहलीचे चार विक्रम.... 


Record No.1 : कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणे सहजासहजी शक्य आहे. पण टी 20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणं कठीण आहे. फक्त 120 चेंडूच्या सामन्यात कुणीतरी एखादाच खेळाडू शतक झळकावतो. पण विराट कोहलीने आयपीएल 2016 मध्ये धुआंधार फलंदाजी करत चार शतके झळकावली आहेत. एखाद्या हंगामात एकाच खेळाडूने इतकी शतके अद्याप झळकावली नाहीत.  हा विक्रम अद्याप तसाच आहे. 


Record No.2 : आयपीएल 2016 मध्ये विराट कोहलीने एबी डिविलियर्ससोबत 229 धावांची भागिदारी केली होती. दोन्ही खेळाडूंनी शतक झळकावले होते. आयपीएलमधील ही सर्वात मोठी भागिदारी आहे. 


Record No.3: विराट कोहलीने IPL 2016 मध्ये 81.08 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडला होता. टी 20 क्रिकेटमध्ये इतक्या मोठ्या सरासरीने धावा काढणे कठीण आहे.  कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्येही इतक्या मोठ्या सरासरीने धावा काढणे शक्य नाही. आतापर्यंत हा विक्रम अबाधित आहे.  


Record No.4 : विराट कोहलीने IPL 2016 मध्ये 16 सामन्यात एकूण 973 धावांचा पाऊस पाडला होता. विराट एक हजार धावांपासून फक्त 27 धावा मागे राहिला. आयपीएलच्या 14 वर्षात विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला 800 धावांचा पल्लाही गाठता आलेला नाही.