Sunrisers Hyderabad New Jersey: आयपीएलच्या 15 हंगामात (IPL 2022) सनरायझर्स हैदराबादचा संघ नवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. सनरायझर्स हैराबाद संघानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून याबाबत माहिती दिलीय. यासोबत त्यांनी आपल्या नव्या जर्सीचाही फोटो शेअर केलाय. सनरायझर्स हैदराबादच्या नव्या जर्सीला मोठी पसंती मिळत आहे. ऑरेंज आर्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादच्या संघाला नव्या जर्सीत पाहण्यासाठी चाहते उस्तुक झाले आहेत. 


ट्वीट-



लवकरच आयपीएल 2022 चं मेगा ऑक्शन
भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामासाठी 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळरू येथे मेगा ऑक्शनचा (IPL Mega Auction) पार पडणार आहे. बंगळरू येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र, आयपीएलच्या मेगा ऑक्शनआधी बीसीसीआयनं (BCCI) स्पर्धा नेमकी कुठे खेळवली जाईल? याची घोषणा करावी, अशी मागणी सर्व फ्रँचायाझींकडून करण्यात आली. याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) महत्वाची माहिती दिलीय. आयपीएलचे साखळी सामने मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) होईल, असं सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलंय.


आयपीएलच्या मेगा ऑक्शनसाठी 590 खेळाडूंची यादी जाहीर
बीसीसीआयनं आयपीएलच्या मेगा लिलावासाठी 590 देशीविदेशी खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएलच्या या मेगा लिलावात उपलब्ध 590 खेळाडूंपैकी सर्वोत्तम पर्यायांना आपल्या ताफ्यात सामावून घेण्याचा प्रत्येक फ्रँचाईझीचा प्रयत्न असेल. त्या 590 खेळाडूंमध्ये 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू आहेत. आयपीएलच्या मेगा लिलावात दहा फ्रँचायझींकडून आपल्या पसंतीच्या शिलेदारावर दौलतजादा करण्यात येईल. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha