IND vs WI, 2nd ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला सहा विकेट्सनी मात देत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता दुसरा सामना उद्या अर्थात 8 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत एक सामना जिंकल्याने भारताने 1-0 ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकल्यास भारत विजयी आघाडी घेऊ शकतो. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करु शकतो. 


कुठे खेळवला जाणार सामना?


हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.


कधी खेळवला जाणार सामना?


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा दुसरा सामना उद्या अर्थात 9 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाणार आहे. 


पहिल्या सामन्यात भारत सहा विकेट्सनी विजय


पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना हात खोलण्याची संधी दिलीच नाही. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा जेसन होल्डर (57) याने केल्या असून कर्णधार पोलार्डतर शून्यावर बाद झाला. ज्यामुळे संघ 43.5 ओव्हरमध्ये 176 धावांच करु शकला आहे. भारताकडून युझवेंद्र चहलने 4, सुंदरने 3, प्रसिधने 2 आणि सिराजने 1 विकेट घेतली. ज्यानंतर 177 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताकडून रोहित आणि इशान यांनी उत्तम सुरुवात केली. पण अर्धशतक होताच 60 धावांवर रोहित बाद झाला. त्यानंतर इशान (28), कोहली (8), पंत (11) हे पटापट तंबूत परतले. पण नंतर सूर्यकुमार यादव (नाबाद 34) आणि दीपक हुडा (नाबाद 26) यांनी अखेरपर्यंत क्रिजवर टीकत राहून भारताचा विजय पक्का केला. सामन्यानंतर माजी कर्णधार विराटने एक जिंकला दोन बाकी असं सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचा उत्साह दर्शवला आहे.


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha