IND vs WI, 2nd ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु असून दुसरा सामना पार पडत आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला सहा विकेट्सनी मात देत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. पण दुसऱ्या सामन्यात भारताची सुरुवात डळमळीत झाली आहे. राहुल (KL Rahul) आणि सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) डाव सावरला असला तरी रोहित, विराट आणि पंत मात्र स्वस्तात माघारी परतले होते. यात सर्वात पहिली विकेट कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अतिशय सहज गमावली. रोहित केवळ पाच धावा करुन तंबूत परतला. दरम्यान अशाप्रकारे सहजपणे रोहित बाद झाल्याने त्याच्यावर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 


अहमदाबादमध्ये पार पडणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने गोलंदाजी निवडली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताने एक वेगळा प्रयोग केला. यावेळी सलामीला रोहितसोबत यष्टीरक्षक ऋषभ पंत सलामीला आला. पण रोहित काही चेंडू खेळून अवघ्या पाच धावा करुन बाद झाला. केमर रोच सामन्यातील तिसरी ओव्हर टाकत असताना शेवटच्या चेंडूवर रोहितने बाहेरच्या बाजूस जाणाऱ्या चेंडूला दिशा देण्यासाठी बॅट फिरवली, पण नीट कनेक्शन न झाल्याने चेंडू कट लागून थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला. अशा पद्धतीने अतिशय सहजपणे रोहितने आज विकेट गमावली.



भारताला मालिका जिंकण्याची तर विडिंजला बरोबरीची संधी


तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकल्याने या मालिकेत 1-0 ची आघाडी भारताने घेतली आहे. त्यामुळे आता पार पडणारा दुसरा सामना जिंकल्यास भारत विजयी आघाडी घेऊ शकतो. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ हा दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करु शकतो. 


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha