IPL 2022: हैदराबाद सनरायजर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2022 चा 46 वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात चेन्नईच्या संघानं हैदराबादचा 13 धावांनी विजय मिळवला आहे. या हंगामातील सुरूवातीचे दोन सामने गमावून सलग पाच सामने जिंकून कमबॅक करणाऱ्या हैदराबादच्या संघाची गाडी पुन्हा रूळावरून घसरली आहे. हैदराबादच्या संघाला दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. यातच हैदराबादच्या संघाची चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय. संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापग्रस्त झाला आहे. हैदराबादचा दिल्लीविरुद्ध त्यांचा पुढचा सामना खेळणार आहे. या सामन्याला वॉशिंग्टन सुंदर मुकण्याची शक्यता आहे.
सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "रविवारी चेन्नईविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना वॉशिंग्टन सुंदर दुखापत झाली. ज्यामुळं चेन्नईविरुद्ध सामन्यात तो गोलंदाजी करू शकला नाही. यापूर्वी ज्या हाताला दुखापत झाली होती, त्याच हाताला दुखापत होणे हे दुर्दैवी आहे. पूर्वीची दुखापत पूर्णपणे बरी झाली होती, पण त्याच जागी त्याला पुन्हा दुखापत झाली आहे.त्याला दुखापत झाल्यानं आमच्या गोलंदाजीवर परिणाम झाला. कारण, तो आमच्यासाठी महत्त्वाचा गोलंदाज आहे."
"जेव्हा तुम्ही तुमचा मुख्य गोलंदाज गमावता, तो संघासाठी मोठा धक्का असतो. नटराजनही दुखापतीमंळे काही काळ मैदानाबाहेर होता. या सामन्यात चौदाव्या आणि पंधराव्या षटकापर्यंत सात षटके होती, जी आमच्या मुख्य गोलंदाजांनी केली नाहीत. यामुळं आम्ही 20-30 धावा अधिक गमावल्या", असं टॉम मूडी म्हणाले.
हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन दुखापतग्रस्त झाल्यानं चेन्नईविरुद्ध सामन्यात त्याला अर्ध्यातून बाहेर जावं लागलं. यामुळं हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसननं पाचवा गोलंदाज म्हणून एडन मार्कराम आणि शशांक सिंह यांना गोलंदाजीसाठी बोलावले. या दोघांनी चार षटकात 46 धावा दिल्या.
हे देखील वाचा-