KKR vs RR: कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल 2022 चा 47 वा सामना खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याच्या संघानं राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. या सामन्यात सामन्यात कोलकात्याच्या संघानं युवा फलंदाज अनुकूल रॉयला (Anukul Roy) संघात संधी दिली आहे. अनुकूल रॉयल कोलकात्याची जर्सी घालून त्याचा पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्यानं याआधी आयपीएलमध्ये एकच सामना खेळला आहे.


आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकात्यानं अनुकूल रॉयवर विश्वास दाखवून त्याला 20 लाखात विकतं घेतलं. यंदाच्या हंगामात कोलकात्यानं 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, सहा सामन्यात पराभूत झाले आहेत. राजस्थानविरुद्ध कोलकात्यांचा संघ त्यांचा दहावा सामना खेळत आहे. राजस्थाविरुद्ध सामन्यात अनुकूल रॉय कोलकात्याची जर्सी घालून मैदानात उतरला आहे. भारतीय अंडर-19 संघात अनुकूल रॉयनं आपली छाप सोडली आहे. याशिवाय, झारखंड, बिहार आणि इंडिया बी आणि मुंबई इंडियन्ससाठी तो खेळला आहे. 


अनुकूल रॉयची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
अनुकूल रॉयनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 28 डावांत 729 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतक आणि तीन अर्धशतकाचा समावेश आहे. फलंदाजीनंच नव्हेतर त्यानं गोलंदाजी करत सर्वांचं लक्ष्य वेधलं आहे. याच फॉरमॅटमध्ये त्यानं 50 विकेट्सही घेतल्या आहेत. अनुकुलने 'लिस्ट ए' च्या 27 डावात 695 धावा केल्या आहेत. ज्यात त्यानं तीन अर्धशतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्यानं 34 विकेट्स घेतल्या आहेत. 31 टी-20 सामन्यात 304 धावा करत त्यानं 19 विकेट्सही घेतल्या आहेत.


हे देखील वाचा-