SRH vs GT : गुजरातचा आठ गड्यांनी पराभव, विल्यमसन-अभिषेक शर्माची दमदार फलंदाजी

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानात आज गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) हा सामना पार पडणार आहे.

abp majha web team Last Updated: 11 Apr 2022 11:17 PM
SRH vs GT : गुजरातचा आठ गड्यांनी पराभव

SRH vs GT : केन विल्यमसनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर हैदराबादने गुजरातचा आठ गड्यांनी पराभव केला. 

SRH vs GT : कर्णधार केन विल्यमसनचं अर्धशतक

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने दमदार अर्धशतक साजरे केले आहे. हैदराबाद संघाला विजयासाठी 26 चेंडूत 35 धावांची गरज

SRH vs GT : राहुल त्रिपाठी रिटायर्ट हर्ट

SRH vs GT :  राहुल त्रिपाठी 17 धावांवर रिटायर्ट हर्ट झाला आहे. हैदराबाद संघाला विजयासाठी 29 चेंडूत 46 धावांची गरज 

SRH vs GT : विल्यमसनची कर्णधाराला साजेशी खेळी

SRH vs GT :  हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याची कर्णधारपदाला साजेशी खेळी. 163 धावांचा पाठलाग करताना विल्यमसन 42 धावांवर खेळत आहे. हैदराबाद संघाला विजयासाठी 41 चेंडूत 59 धावांची गरज

SRH vs GT : हैदराबादची दमदार सुरुवात

SRH vs GT :  गुजरातने दिलेल्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदाराबाद संघाने दमदार सुरुवात केली आहे. 11 षटकानंतर एक बाद 78 धावा

SRH vs GT : हैदराबादसमोर 163 धावांचे आव्हान

हार्दिकच्या अर्धशतकाने गुजरातने 162 धावा स्कोरबोर्डवर लावल्या असून आता हैदराबादसमोर 163 धावांचे लक्ष्य आहे.

SRH vs GT : हार्दिकचं अप्रतिम अर्धशतक

अंडर प्रेशर असं अर्धशतक हार्दिक पंड्यानं झळकावलं आहे.

SRH vs GT : अभिनव मनोहर बाद

एक 35 धावांची चांगली आणि संघाला फायदेशीर खेळी करुन अभिनव मनोहर बाद झाला आहे. भुवनेश्वरने त्याला बाद केलं आहे.

SRH vs GT : डेव़्हिड मिलरही बाद

12 धावा करुन डेव्हिड मिलरही तंबूत परतला आहे. मार्कोने त्याला बाद केलं आहे.

SRH vs GT : उम्रानने घेतली वेडची विकेट

वेगवान गोलंदाज उम्रान मलिकने मॅथ्यू वेडला पायचीत केलं आहे.

IPL 2022: गुजरातनं दुसरी विकेट्स गमावली

मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या एकविसाव्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध गुजरातनं दुसरा विकेट्स गमावला आहे. शुभमन गिलनंतर साई सुधारसन आऊट झाला आहे. 


 

SRH Vs GT: गुजरातला पहिला झटका, शुभमन गिल बाद

पहिल्या षटकात खराब गोलंदाजी केल्यानंतर हैदराबादच्या संघानं कमबॅक केलं आहे. भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर शुभमन गिलनं आपली विकेट्स गमावली आहे. त्यानं 9 चेंडूत 7 धावा केल्या आहेत. 

SRH vs GT : सामन्याला सुरुवात, भुवनेश्वरची खराब गोलंदाजी

पहिलं षटक घेऊन आलेल्या भुवनेश्वरने अगदी खराब लाईनवर गोलंदाजी केल्याने दोन वाईड चेंडूसह चौकार गेल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्यामुळे पहिल्या षटकात 17 धावा आल्या आहेत.

SRH vs GT : हैदराबादने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय़

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्यापूर्वी नुकतीच नाणेफेक झाली असून हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.

SRH vs GT : सामन्याला अवघा एक तास शिल्लक

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला अवघा एक तास शिल्लक राहिला आहे.


 





कसा आहे पिच रिपोर्ट?

आजचा सामना पार पडणाऱ्या नवी मुंबईतील डी.वाय.पाटील मैदानात आजही एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो. आतापर्यंत झालेल्या सामन्यात संघाकडून चांगला स्कोर होताना पाहायाला मिळत आहे. अगदी मोठा नाही तर अगदी कमीही नाही, आव्हानात्मक स्कोर उभा होत असल्याने सामने् चुरशीचे होत आहेत. त्यात आजचा सामना सायंकाळी सामना असल्याने लाईट आणि दवाच्या अडचणीमुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी घेऊन स्कोर चेस करण्याच्या प्रयत्नात असेल. 

गुजरातचे संभाव्य अंतिम 11  

शुभमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी, दर्शन नालकांडे 

हैदराबादचे संभाव्य अंतिम 11  

अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, टी. नटराजन, कार्तिक त्यागी 


 

पार्श्वभूमी

SRH vs GT, Live Updates : आयपीएलमधील (IPL 2022) आजचा 21 वा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) या दोघांमध्ये पार पडत आहे. सध्या गुणतालिकेत तिसऱ्यास्थानी असणाऱ्या गुजरातने एकही सामना गमावला नसून हैदराबादने देखील शेवटच्या सामन्यात दमदार चेन्नई सुपरकिंग्सला मात दिली आहे. त्यामुळे आजचा सामना दमदार होणार यात शंका नाही. 


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना पार पडणाऱ्या नवी मुंबईतील डी.वाय.पाटील मैदानात आजही एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो. आतापर्यंत झालेल्या सामन्यात संघाकडून चांगला स्कोर होताना पाहायाला मिळत आहे. अगदी मोठा नाही तर अगदी कमीही नाही, आव्हानात्मक स्कोर उभा होत असल्याने सामने् चुरशीचे होत आहेत. त्यात आजचा सामना सायंकाळी सामना असल्याने लाईट आणि दवाच्या अडचणीमुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी घेऊन स्कोर चेस करण्याच्या प्रयत्नात असेल. 


हैदराबादचे संभाव्य अंतिम 11  


अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, टी. नटराजन, कार्तिक त्यागी 


गुजरातचे संभाव्य अंतिम 11  


शुभमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी, दर्शन नालकांडे 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.