RR vs MI, IPL 2022 : सूर्यकुमार चमकला, मुंबईकडून राजस्थानचा पराभव
RR vs MI, IPL 2022 Live Score : रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईचा संघ पहिल्या विजयासाठी मैदानात तरणार.. मुंबईपुढे राजस्थानचं आव्हान
RR vs MI, IPL 2022 Marathi News : सूर्यकुमार यादवनंतर लगेच तिलक वर्माही बाद झाला. तिलक वर्माने 30 चेंडूत 35 धावांची खेळी केली.
RR vs MI, IPL 2022 Marathi News : सूर्यकुमार यादवने अश्विनला षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 2 षटकार पाच चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. तिलक वर्माही 27 धावांवर खेळत आहे.
तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या भागिदारीच्या जोरावर मुंबईने 12.3 षटकांत 100 धावांचा टप्पा पार केला आहे. मुंबईला विजयासाठी 44 चेंडूत 58 धावांची गरज आहे.
RR vs MI, IPL 2022 Marathi News : ईशान किशन आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मुंबईचा डाव सावरलाय. मुंबई दोन 70 धावा
RR vs MI, IPL 2022 Marathi News : 159 धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला सहा षटकात दोन धक्के बसले आहेत. कर्णधार रोहित शर्मा (2) आणि ईशान किशन (26) धावांवर बाद झालेत.
RR vs MI, IPL 2022 Marathi News : जोस बटलरच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 159 धावांचे आव्हान असेल. मुंबईचा संघ हा सामना जिंकून कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाची विजयी भेट देणार का?
मुंबईविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात 134 धावांवर राजस्थानचा निम्मा संघ माघारी परतला आहे. रियान परागच्या रुपात राजस्थानला पाचवा झटका बसलाय.
संजू सॅमसनच्या रुपात राजस्थानला दुसरा धक्का बसला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानची सुरुवात खराब झाली आहे. राजस्थानचा आक्रमक फलंदाज जोस बटलर अजूनही खेळत आहे.
मुंबईविरुद्ध नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाला पहिला झटका बसला आहे. देवदत्त पडिक्कलच्या रुपात राजस्थाननं पहिली विकेट गमावली आहे.
RR vs MI, Match Live Updates : जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), डी. मिचेल, शिमरोन हेटायर, रियान पराग, रविचंद्रन अस्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चाहल, कुलदीप सेन
RR vs MI, Match Live Updates : ईशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), टीम डेविड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हर्तिक शौकीन, कायरन पोलार्ड, डॅनिअल सॅम्स, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रायली मेरिडेथ
RR vs MI, Match Live Updates : मुंबईने राजस्थानविरोधात संघात दोन बदल केले आहेत. मुंबईने डेवॉल्ड ब्रेविस आणि जयदेव उनादकट यांना वगळले आहे. कुमार कार्तिकेय सिंह (Kumar Kartikeya Singh) आणि टीम डेविड यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आलेय. राजस्थान रॉयल्सने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ राजस्थानने कायम ठेवलाय.
RR vs MI, Match Live Updates : कुमार कार्तिकेय सिंह मुंबईकडून करणार पदार्पण... थोड्याच वेळात नाणेफेक
RR vs MI, Match Live Updates : यंदाच्या हंगामात मुंबई आणि राजस्थानचा संघ दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थानच्या संघानं बाजी मारली आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ जिंकणार? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
RR vs MI, Match Live Updates : आयपीएलमध्ये मुंबई आणि राजस्थान 26 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 13 सामन्यात मुंबईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, 12 सामन्यात राजस्थानच्या संघानं मुंबईला धुळ चाखली आहे.
RR vs MI, Match Live Updates : यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघानं आठ सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यात मुंबईच्या संघाला पराभव स्वीकारावा लागलाय. तर, दुसरीकडं राजस्थानच्या संघाला आठ पैकी सहा सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे.
पार्श्वभूमी
RR vs MI, IPL 2022 Marathi News : प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडलेल्या मुंबईचा सामना तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. मुंबईला या स्पर्धेत आतापर्यंत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शनिवारी सायंकाळी डी वाय पाटील स्टेडिअममध्ये पार पडणाऱ्या सामन्यात मुंबईचा संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ आठ पराभवासह दहाव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थानचा संघ सहा विजयासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या बटलरला रोखणं मुंबईसाठी कठीण जाऊ शकते. त्याशिवाय यजुवेंद्र चाहलही भेदक मारा करत आहे. पर्पल आणि ऑऱेंज कॅपवर या दोघांचा कब्जा आहे.
मुंबई- राजस्थानची यंदाच्या हंगामातील कामगिरी
यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघानं आठ सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यात मुंबईच्या संघाला पराभव स्वीकारावा लागलाय. तर, दुसरीकडं राजस्थानच्या संघाला आठ पैकी सहा सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर, दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे.
मुंबई- राजस्थान हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये मुंबई आणि राजस्थान 26 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 13 सामन्यात मुंबईच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, 12 सामन्यात राजस्थानच्या संघानं मुंबईला धुळ चाखली आहे. यंदाच्या हंगामात मुंबई आणि राजस्थानचा संघ दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थानच्या संघानं बाजी मारली आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ जिंकणार? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
मुंबई इंडियन्सचे अद्याप सहा सामने बाकी आहेत. या सहा सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. पण प्रतिस्पर्धी संघाला याचा फटका बसू शकतो. कारण मुंबईमुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. मुंबईकडे आता गमावण्यासाठी काहीच नाही, त्यामुळे मुंबईच्या संघावर दबाव नसणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ इतर संघाची वाट लावू शकतात. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यात राजस्थानच्या संघाला पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे लागणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -