RR vs GT Match Live Update : राजस्थानचा 37 धावांनी पराभव, गुजरातची बाजी
IPL 2022, RR vs GT Match Live Update : आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यामध्ये सामना होणार आहे. यंदाच्या हंगमातील हा 24 वा सामना असेल.
RR vs GT Match Live Update : 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातने राजस्थानचा 37 धावांनी पराभव केला.
RR vs GT Match Live Update : गुजरातकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या यश दयाल याने राजस्थानला नववा धक्का दिला. यश दयाल याने चहलला बाद करत तिसरी विकेट घेतली.
RR vs GT Match Live Update : कर्णधार हार्दिक पांड्याने जिमी नीशमला बाद करत राजस्थानला आठवा धक्का दिला. नीशम 17 धावांवर बाद झाला.
RR vs GT Match Live Update :लॉकी फर्गुसन याने रियान परागला बाद करत गुजरातला सातवे यश मिळवून दिले. राजस्थान सात बाद 138 धावा
RR vs GT Match Live Update : मोहम्मद शामीने हेटमायरला बाद करत गुजरातला सहावे यश मिळवून दिले. हेटमायर 29 धावा काढून बाद झाला. राजस्थान सहा बाद 116 धावा
RR vs GT Match Live Update : यश दयाल याने आयपीएलमध्ये दणक्यात पदार्पण केले आहे. यश दयाल याने देवदत्त पडीकलनंतर रॅसी वॅन डुसेन याला बाद करत राजस्थानला पाचवा धक्का दिला आहे.
RR vs GT Match Live Update : देवदत्त पडिकल स्वस्ता माघारी परतला. पडिकलला एकही धाव काढता आली नाही. गुसऱ्या क्रमांकावर आलेल्या अश्विनला 8 धावा काढता आल्या. कर्णधार संजू सॅमसन 11 धावांवर धावबाद झाला. गुजरातकडून लॉकी फर्गुसन याने दोन तर यश दयालने एक विकेट घेतली.
RR vs GT Match Live Update : सलामी फलंदाज जोस बटलर याने वादळी फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली आहे. बटलरने 24 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान बटलरने तीन षटकार आणि 8 चौकार लगावले
RR vs GT Match Live Update : हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर यांनी मोक्याच्या क्षणी संघाचा डाव सावरला. हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर यांनी 55 चेंडूत 86 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या बळावर गुजरातच्या संघाने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली. अभिनव मनोहर याने 28 चेंडूत 43 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने दोन षटकार आणि चार चौकार लगावेल. हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर यांनी गुजरातच्या धावसंख्येचा पाया रचला.
RR vs GT Match Live Update : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. हार्दिकने संघाचा डाव सावरला तोव्हा संयमी फलंदाजी केली. त्यानंतर हार्दिक पांड्या याने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. हार्दिक पांड्याने आधी अभिनव मनोहरसोबत 86 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अखेरच्या षटकात डेविड मिलरसोबत 53 धावांची भागिदारी करता संघाची धावसंख्या वाढवली. हार्दिक पांड्याने 52 चेंडूचा सामना करताना 87 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान पांड्याने चार षटकार आणि 8 चौकार लगावले.
RR vs GT Match Live Update : हार्दिक पांड्या याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत गुजरातच्या संघाचा डाव सावरला. हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी वादळी खेळी केली. हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 192 धावांपर्यंत मजल मारली. हार्दिकला आधी अभिनव मनोहर याने साथ दिली, त्यानंतर डेविड मिलर याने झटपट वादळी खेळी करत संघाची धावसंख्या वाढवली.
RR vs GT Match Live Update : यजुवेंद्र चहल याने अभिनव मनोहर याला बाद करत जोडी फोडली आहे. हार्दिक आणि अभिनव मनोहर यांनी तब्बल 85 धावांची भागिदारी करत राजस्थानच्या अडचणी वाढवल्या होत्या. मोक्याच्या क्षणी चहलने नमोहरला बाद केले. अभिनव मनोहर याने 28 चेंडूत 43 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने दोन षटकार आणि चार चौकार लगावेल. हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर यांनी 55 चेंडूत 86 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या बळावर गुजरातच्या संघाने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली.
RR vs GT Match Live Update : हार्दिक पांड्याची विस्फोटक फलंदाजी पाहून राजस्थान संघाच्या ट्विटवरुन फिरकी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
RR vs GT Match Live Update : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. अभिनवर मनोहर हार्दिकला चांगली साथ देत आहे.
RR vs GT Match Live Update : विकेट पडत असताना हार्दिक पांड्या एका बाजूने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे. हार्दिक पांड्या 28 चेंडूत 40 धावांवर खेळत आहे. गुजरातने 12 षटकांत तीन बाद 87 धावा केल्या आहेत.
RR vs GT Match Live Update : नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फंलदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात खराब झाली आहे. राजस्थानच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा करत गुजरातच्या फलंदाजांना बाद केले. ठरावीक अंताराने गुजरातचे फलंदाज बाद होत गेले. गिल13 धावा काढून माघारी परतला. गुजरात 9.4 षटकानंतर तीन बाद बाद 70 धावा
RR vs GT Match Live Update : कर्णधार हार्दिक पांड्या आणि सलामी फलंदाज शुभमन गिल यांनी गुजरातचा डाव सावरला आहे. हार्दिक पांड्या 18 तर गिल 9 धावांवर खेळत आहेत. सहा षटकानंतर गुजरातने दोन बाद 42 धावा केल्या आहेत.
RR vs GT Match Live Update : मॅथ्यू वेडच्या रुपाने गुजरातला पहिला धक्का बसला आहे. वेड अवघ्या 12 धावांवर धावबाद झाला आहे.
RR vs GT Match Live Update :नाणेफेक गमाल्यानंतर गुजरातकडून मॅथ्यू वेड आणि शुभमन गिल सलामीसाठी मैदानात उतरले आहेत. तर निशम पहिलं षटक घेऊन आलाय
RR vs GT Match Live Update : राजस्थानचा आयपीएलमधील हा पाचवा सामना आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने पहिल्यांदाच नाणेफेक जिंकली आहे. याआधी झालेल्या चारही सामन्यात संजू सॅमसन याने नाणेफेक गमावली होती.
RR vs GT Match Live Update : राजस्थानच्या संघात एक बदल कऱण्यात आला आहे. राजस्थानने भेदक गोलंदाज ट्रेंट बोल्टला दुखापतीमुळे आराम देण्यात आला आहे. बोल्टच्या जागी राजस्थानने जिमी निशमला संधी दिली आहे. तर गुजरात संघातही महत्वाचे दोन बदल कऱण्यात आले आहेत. निलकंडे आणि साई सुदर्शन यांना हार्दिक पांड्याने प्लेइंग 11 मधून वगळले आहे. त्यांच्या जागी यश दयाल आणि विजय शंकर यांना संधी देण्यात आली आहे.
RR vs GT Match Live Update : जोस बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकिपर), रॅसी वॅन डेर डुसेन, शिमरोन हेटमायर, रियान पराग, जिमी निशम, आर अश्विन, यजुवेंद्र चाहल, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन
RR vs GT Match Live Update : राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागणार आहे.
RR vs GT Match Live Update : राजस्थानविरोधात हार्दिक पांड्या आठ वेळा मैदानात उतरला आहे. हार्दिक पांड्याने राजस्थानच्या गोलंदाजांनी मनसोक्त धुलाई केली. हार्दिकने 186 च्या स्ट्राइक रेटने धावा कुटल्या आहेत. त्याने तब्बल 62 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याशिवाय चार विकेटही घेतल्या आहेत. यंदाच्या हंगामात राजस्थान आणि गुजरात पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. त्यात हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून मैदानात उतरत आहे.
RR vs GT Match Live Update : हार्दिक पांड्याला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. टी 20 क्रिकेटमध्ये 100 झेल घेण्याच्या विक्रमापासून हार्दिक पांड्या दोन पावले दूर आहे. राजस्थानविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्याने दोन झेल घेतल्यास टी 20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 100 झेलची नोंद होणार आहे. आतापर्यंत हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने चार सामन्यात तीन विजय मिळवले आहेत.
RR vs GT Match Live Update : राजस्थानच्या संघाकडून फलंदाजीची धुरा जोस बटलरवर याच्यावर असणार आहे. तर शिम्रॉन हेटमायर हा देखील चांगली खेळी करताना दिसत आहे. देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार संजू सॅमसन हे दोघे सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहेत. राजस्थानकडे वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा योग्य समतोल साधण्यात आला आहे. फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलवर राजस्थानच्या फिरकीची मदार असणार आहे. तर रविचंद्रन अश्विनची त्याला पुरेशी साथ मिळत आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट प्रतिस्पर्धी संघांसाठी घातक ठरत आहेत. तर गुजरातच्या फलंदाजीची भिस्त शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पंड्यावर आहे. मॅथ्यू वेड धावांसाठी झगडत आहे. तर डेव्हिड मिलरचा खेळही अपेक्षेनुसार उंचावलेला नाही. अभिनव मनोहर आणि बी. साई सुदर्शन यांनी जबाबदारीने खेळ करण्याची गरज आहे. राहुल तेवतिया देखील चांगली खेळी करत आहे. सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक गणला जाणारा लॉकी फग्र्युसन, मोहम्मद शमी असा वेगवान गोलंदाज गुजरातकडे आहेत. फिरकी गोलंदाज रशीद खान हा त्यांचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.
RR vs GT Match Live Update : डीवाय पाटील मैदानाची खेळपट्टी फिरकीस पोषक आहे. या मैदानावर फिरकी गोलंदाजांचा दबदबा राहू शकतो. गुजरातच्या संघात राशिद खानसारखा दर्जेदार फिरकी गोलंदाज आहे. तर राजस्थानच्या संघात चाहल आणि अश्विनची जोडी आहे.
RR vs GT Match Live Update : नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यापैकी राजस्थान संघाचा दोन सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव झाला आहे. या मैदानावर राजस्थान रॉयल्सने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. मुंबईला राजस्थानने हरवले होते. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने या मैदानावर एक सामना खेळला आहे. या सामन्यात गुजरातला हैदराबादकडून पराभव स्विकारावा लागला होता. गुजरातसाठी दिलासादायक बाब म्हणजे हार्दिक पांड्याने या मैदानावर अर्धशतकी खेळी केली होती.
पार्श्वभूमी
IPL 2022, RR vs GT Match Live Update : गुरुवारी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यामध्ये सामना होणार आहे. यंदाच्या हंगमातील हा 24 वा सामना असेल. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. यंदाच्या हंगमात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजतार टायन्स संघाने चार सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. तर संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघानेही पहिल्या चार सामन्यात तीन विजय मिळवले आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे गुणतालिकेत राजस्थानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातचा संघ सहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
राजस्थानच्या संघाकडून फलंदाजीची धुरा जोस बटलरवर याच्यावर असणार आहे. तर शिम्रॉन हेटमायर हा देखील चांगली खेळी करताना दिसत आहे. देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार संजू सॅमसन हे दोघे सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहेत. राजस्थानकडे वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा योग्य समतोल साधण्यात आला आहे. फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलवर राजस्थानच्या फिरकीची मदार असणार आहे. तर रविचंद्रन अश्विनची त्याला पुरेशी साथ मिळत आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट प्रतिस्पर्धी संघांसाठी घातक ठरत आहेत. तर गुजरातच्या फलंदाजीची भिस्त शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पंड्यावर आहे. मॅथ्यू वेड धावांसाठी झगडत आहे. तर डेव्हिड मिलरचा खेळही अपेक्षेनुसार उंचावलेला नाही. अभिनव मनोहर आणि बी. साई सुदर्शन यांनी जबाबदारीने खेळ करण्याची गरज आहे. राहुल तेवतिया देखील चांगली खेळी करत आहे. सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक गणला जाणारा लॉकी फर्गुसन, मोहम्मद शामी असे वेगवान गोलंदाज गुजरातकडे आहेत. फिरकी गोलंदाज रशीद खान हा त्यांचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. दरम्यान, दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू आहेत. विशेष म्हणजे या संघामध्ये चांगला समतोल असल्याचे पाहायला मिळत आहे. या संघांनी आत्तापर्यंत चांगली कामगिरी केल्यामुळे आज होणारी लढत चुरशीची होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डीवाय पाटील स्टेडिअमवर दोन्ही संघाची कामगिरी-
नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यापैकी राजस्थान संघाचा दोन सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव झाला आहे. या मैदानावर राजस्थान रॉयल्सने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. मुंबईला राजस्थानने हरवले होते. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने या मैदानावर एक सामना खेळला आहे. या सामन्यात गुजरातला हैदराबादकडून पराभव स्विकारावा लागला होता. गुजरातसाठी दिलासादायक बाब म्हणजे हार्दिक पांड्याने या मैदानावर अर्धशतकी खेळी केली होती.
पिच रिपोर्ट
डीवाय पाटील मैदानाची खेळपट्टी फिरकीस पोषक आहे. या मैदानावर फिरकी गोलंदाजांचा दबबा राहू शकतो. गुजरातच्या संघात राशिद खानसारखा दर्जेदार फिरकी गोलंदाज आहे. तर राजस्थानच्या संघात चाहल आणि अश्विनची जोडी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -