RR vs CSK, Match Live Updates : राजस्थानचा चेन्नईवर पाच गड्यांनी विजय

आयपीएलमध्ये (IPL 2022) आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या संघामध्ये मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात सामना पार पडत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 May 2022 11:10 PM
राजस्थानचा चेन्नईचा पाच गड्यांनी विजय

राजस्थान संघाने अखेरच्या साखळी सामन्यात अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर राजस्थानने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. 

राजस्थानचा अर्धा संघ तंबूत, शिमरोन हेटमायर बाद

तुफान फॉर्ममध्ये असलेला शिमरोन हेटमायरला बाद करत सोळंकीने चेन्नईला पाचवे यश मिळवून दिलेय. राजस्थान पाच बाद 112 धावा.

राजस्थानला आणखी एक धक्का, यशस्वी जयस्वाल बाद

यशस्वी जयस्वाल अर्धशतकानंतर बाद... राजस्थानला चौथा धक्का... राजस्थान चार बाद 104 धावा

देवदत्त पडिक्कल बाद, राजस्थानला तिसरा धक्का

मोईन अलीने देवदत्त पडिकलला बाद करत राजस्थानला तिसरा धक्का दिलाय. पडिकल 3 धावा काढून बाद झालाय

Sanju Samson :  राजस्थानला मोठा धक्का, कर्णधार संजू सॅमसन बाद

Sanju Samson :  मिचेल सँटनरने संजू सॅमसनला बाद करत चेन्नईला दुसरे यश मिळवून दिले. संजू सॅमसन 15 धावा काढून बाद झाला. 

RR vs CSK : जैस्वाल-संजूने सांभाळला डाव

बटलर स्वस्तात माघारी परतल्यानंतर जैस्वाल आणि संजूने डाव सांभाळला असून यशस्वी फटकेबाजी करत असून संजू संयमी खेळ दाखवत आहे.

RR vs CSK : बटलर स्वस्तात माघारी

यंदाच्या हंगामात दमदार फलंदाजी करणारा जोस बटलर आज केवळ 2 धावा करुन बाद झाला आहे. सिमरनजीत सिंहने त्याला बाद केलं आहे.

RR vs CSK : चेन्नईची 150 धावांपर्यंत मजल

चेन्नई संघाने 150 धावा केल्याने आता राजस्थानला विजयासाठी 151 धावा करायच्या आहेत.

RR vs CSK : चेन्नईच्या 100 धावा पूर्ण

मोईने अलीने डाव सांभाळल्याने चेन्नईच्या संघाने 100 धावा पूर्ण केल्या आहेत.

RR vs CSK : रायडू बाद

युझवेंद्र चहलने अंबाती रायडूला स्वस्तात तंबूत धाडलं आहे.

RR vs CSK : 10 षटकानंतर चेन्नई 94/3

चेन्नईच्या फलंदाजीची 10 षटकं पूर्ण झाली असून त्यांचा स्कोर 94 वर तीन बाद आहे. सध्या मोईन अली आणि अंबाती रायडू फलंदाजी करत आहेत.

RR vs CSK: मोईन अलीचं तुफान अर्धशतक

राजस्थानविरुद्ध सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या रुपात चेन्नईच्या संघाला पहिला धक्का बसला आहे. मात्र, त्यानंतर मोईन अलीनं आक्रमक फलंदाजी करत केवळ 19 चेंडूत अर्धशतक ठोकलंय. 


 

RR vs CSK: चेन्नईला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड बाद

राजस्थानविरुद्ध सामन्यात चेन्नईच्या संघाची खराब सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या डावातील पहिल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ऋतुराज गायकवाड बाद झाला आहे. केवळ दोन धावा करून तो माघारी परतला आहे. 


 

RR vs CSK :चेन्नई अंतिम 11 

डेवॉन कॉन्वे, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), एन. जगदीशन, मिचेल सँटनर, महेश चौधरी, महेश तीक्ष्णा, सिमरनजीत सिंह.

RR vs CSK : राजस्थान अंतिम 11

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग,  रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल


 

RR vs CSK : राजस्थान अंतिम 11

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग,  रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल


 

RR vs CSK : चेन्नईने नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी

धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राजस्थान प्रथम गोलंदाजी करेल.

RR vs CSK : आजवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

आजवर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (RR vs CSK) हे संघ तब्बल 25 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता चेन्नईचंच पारडं जड राहिलं आहे. चेन्नईने 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 10 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.

RR vs CSK :चेन्नई संभाव्य अंतिम 11  

डेवॉन कॉन्वे, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), मिचेल सँटनर, महेश चौधरी, महेश तीक्ष्णा, प्रशांत सोळंकी.  

RR vs CSK : राजस्थान संभाव्य अंतिम 11

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग,  रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल


 

RR vs CSK : आज राजस्थान-चेन्नई आमने-सामने

आयपीएलमधील(IPL 2022) आजच्या 69 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (RR vs CSK) हे संघ आमने-सामने आहेत.

पार्श्वभूमी

RR vs CSK, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (RR vs CSK) या संघात सामना पार पडत आहे. गुणतालिकेचा विचार करता राजस्थान रॉयल्सने 13 पैकी 8 सामने जिंकत 16 गुण मिळवले आहेत. त्यामुळे ते तिसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपरकिंग्सने 13 पैकी 9 सामने गमावल्याने ते नवव्या स्थानावर आहेत. राजस्थानच्या संघाला प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी आजचा विजय महत्त्वाची भूमिका बजावेल. आज जिंकताच ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. तर चेन्नई सुपरकिंग्सचा यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना असल्याने ते स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी आज सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील.


आजवर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स (RR vs CSK) हे संघ तब्बल 25 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता चेन्नईचंच पारडं जड राहिलं आहे. चेन्नईने 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 10 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. आजचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. दरम्यान आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची शक्यता अधिक आहे.


राजस्थान संभाव्य अंतिम 11


यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग,  रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल


चेन्नई संभाव्य अंतिम 11  


डेवॉन कॉन्वे, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), मिचेल सँटनर, महेश चौधरी, महेश तीक्ष्णा, प्रशांत सोळंकी.  


हे देखील वाचा- 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.