Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
अभिनेत्री नयनतारा सध्या साऊथचा सुपरस्टार धनुषमुळे चर्चेत आहे. याआधीही नयनतारा अनेकदा वादात सापडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1984 रोजी बेंगळुरू येथे झाला. नयनताराचे खरे नाव डायना मरियम कुरियन आहे. साऊथ चित्रपटात येण्यापूर्वी नयनताराने धर्म बदलला होता. आता नयनतारा हिंदू धर्म पाळते.
काही वर्षांपूर्वी नयनतारा आणि तिच्या बॉयफ्रेंडचे खासगी व्हिडिओ लीक झाले होते.
त्यावेळी या बातमीने संपूर्ण इंडस्ट्री हादरली. मात्र, कालांतराने लोकांना या घटनेचा विसर पडला.
नयनतारा तिच्या चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडली. 2015 मध्ये तिची विघ्नेश शिवनसोबत चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. कालांतराने दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. 7 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी गुपचूप लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
अलीकडेच साऊथचा सुपरस्टार धनुषने नयनताराला नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मिळताच नयनतारा धनुषवर चिडली. सध्या तरी हे प्रकरण चर्चेत आहे.
नयनतारा सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांची आई बनली आहे. मात्र, अशाप्रकारे आई झाल्यामुळे नयनतारा लोकांच्या निशाण्यावर आली होती, असे मानले जाते की, नयनतारा लग्नाच्या 5 महिन्यांपूर्वीच गर्भवती झाली होती. मात्र, चाहत्यांकडे याचा कोणताही पुरावा नाही.
नयनताराने प्रभू रामाचा अपमान केला आहे. 'अन्नपूर्णानी' चित्रपटात नयनताराने भगवान राम यांना मांसाहारी संबोधून खळबळ उडवून दिली होती.
यानंतर नयनताराला जनतेची माफी मागावी लागली. इतकेच नाही तर नयनताराचा हा चित्रपट ओटीटीवरूनही हटवण्यात आला होता.
रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, नयनताराने तिचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली आहे. मात्र, नयनताराने ही बातमी साफ फेटाळून लावली होती.
image 11