6, 4, 6, 6, 4, 6... कमिन्सचं वादळी अर्धशतक, 15 चेंडूत 56 धावा, राहुलच्या विक्रमाशी बरोबरी
IPL 2022 : कमिन्सने मुंबईच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेतला. डॅनियल सॅम्सच्या षटकात तर कमिन्सने धावांचा पाऊसच पाडला. पॅट कमिंस डिनियल सॅम्सच्या षटकात 6, 4, 6, 6, 4, 6 असा धावांचा पाऊस पाडला.
Patt Cummins IPL Record : पॅट कमिन्सच्या वादळात मुंबईची दाणादाण उडाली आहे. कमिन्सने मोक्याच्या क्षणी वादळी खेळी करत मुंबईचा विजय हिरावून आणला. कमिन्सने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. कमिन्सच्या खेळीच्या बळावर कोलकाताने मुंबईचा पाच विकेटनं पराभव केला. मुंबईने दिलेले 162 धावांचे आव्हान कोलकाताने अवघ्या 16 षटकात पार केले. कमिन्सने 15 चेंडूत 56 धावांची खेळी केली. पॅट कमिन्स मैदानावर आला तेव्हा कोलकाता संघाला विजयासाठी 41 चेंडूत 61 धावांची गरज होती. यावेळी कमिन्सने 15 चेंडूत 56 धावांची खेळी करत कोलकाताला 24 चेंडू राखून विजय मिळवून दिला.
कमिन्सने मुंबईच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेतला. डॅनियल सॅम्सच्या षटकात तर कमिन्सने धावांचा पाऊसच पाडला. पॅट कमिंस डिनियल सॅम्सच्या षटकात 6, 4, 6, 6, 4, 6 असा धावांचा पाऊस पाडला. म्हणजे कमिन्सने या षटकात चार षटकार आणि दोन चौकार लगावत 35 धावा वसूल केल्या. या षटकानंतर सामना कोलकात्याच्या बाजूने झुकला. वादळी खेळीमुळे कमिन्सला सामनाविर पुरस्काराने गौरवण्यात आले.
मुंबईविरोधात कमिन्सने 56 धावा कशा मारल्या...
1,6,4,0,0,6,4,1,6,4,6,6,2,4,6
केएल राहुलशी बरोबरी
पॅट कमिन्सने 14 चेंडूत अर्धशतक झळकावत केएल. राहुलच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. राहुलने 2018 मध्ये 14 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तत्याशिवाय युसूफ पठाण आणि सुनिल नारायण यांनी प्रत्येकी 15 चेंडूत अर्धशतक झळकावलेय. तर सुरेश रैना आणि ईशान किशन यांनी प्रत्येकी 16 चेंडूत अर्धशतकी खेळी केली.
कमिन्सचं वादळ, वेंकटेशचा संयम, कोलकात्याचा मुंबईवर विजय -
मुंबईने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघाची सुरुवात निराशाजनक झाली. कोलकाताने नियमित अंतराने आपल्या विकेट फेकल्या. सलामी फंलदाज अजिंक्य रहाणे 7, कर्णधार श्रेयस अय्यर 10, सॅम बिलिंग्स 17, नितेश राणा 8 आणि आंद्रे रसेल 11 धांवावर बाद झाले. एका बाजूने वेंकटेश अय्यर किल्ला लढवत होता, मात्र दुसऱ्या बाजूला फलंदाज हराकिरी करत होते. त्यामुळे कोलकाता संघ पराभवाच्या छायेत पोहचला होता. मात्र, पॅट कमिन्स याने वादळी खेळी करत मुंबईला विजयापासून दूर ठेवले. पॅट कमिन्सने अवघ्या 15 चेंडूत 56 धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान कमिन्सने सहा षटकार आणि चार चौकार लगावले. कमिन्सने मोक्याच्या क्षणी 14 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. कमिन्स आणि वेंकटेश अय्यर यांनी 18 चेंडूत 61 धावांची भागिदारी केली. या जोरावर कोलकाताने अशक्यप्राय विजय मिळवला आहे.