IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगामात अखेरच्या टप्प्यावर पोहचला आहे. या हंगामातील फक्त चार सामने खेळायचे शिल्लक आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये असे काही खेळाडूही पाहायला मिळाले. ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे किंवा दीर्घकाळापासून आपल्या देशासाठी खेळले नाहीत. परंतु, आयपीएल 2022 मध्ये त्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. अशा खेळाडूंवर एक नजर टाकुयात. 


महेंद्रसिंह धोनी
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं नेतृत्व करताना दिसत आहे. आयपीएल 2022 मध्ये धोनीनं 14 सामन्यात 33.14 च्या सरासरीनं 232 धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. 


फाफ डू प्लेसिस 
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानं प्लेऑफमध्ये एन्ट्री केली आहे. यंदाचा हंगाम डू प्लेसिससाठी चांगला ठरला आहे. या हंगामात त्यानं 14 सामने खेळले आहेत. ज्यात 34.08 च्या सरासरीने एकूण 443 धावा केल्या आहेत. दरम्यान, फाफ डू प्लेसिसनं फेब्रुवारी 2021 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 


ड्वेन ब्राव्हो
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होनं यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करून दाखवली आहे. ड्वेन ब्राव्हो हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. ब्राव्होनं आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी 10 सामन्यांमध्ये 18.69 च्या सरासरीनं 16 विकेट घेतल्या आहे. ब्राव्होनं २०२१ च्या टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.


सुनील नारायण
वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज सुनील नारायणनं ऑगस्ट, 2019 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आयपीएलमध्ये सुनील नारायणनं कोलकात्याकडून खेळत आहे. यंदाच्या हंगामात सुनील नारायणनं 14 सामन्यात 34.67 च्या सरासरीनं नऊ विकेट्स घेतल्या आहेत. 


रॉबिन उथप्पा
चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज रॉबिन उथप्पानं आयपीएल 2022 मध्ये 12 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यानं दोन अर्धशतकांच्या मदतीनं 230 धावा केल्या. 36 वर्षीय रॉबिन उथप्पा जुलै 2015 मध्ये भारतासाठी शेवटचा खेळला होता.


हे देखील वाचा-