GT vs RR, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पहिला क्वॉलीफायर सामना खेळवला जात आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असून जिंकणारा संघ थेट फायनलच्या सामन्यात पोहोचेल. तर पराभूत होणारा संघ क्वॉलीफायर दोनचा सामना खेळेल. दरम्यान आज समोरासमोर असणाऱ्या दोन्ही संघाची गुणतालिकेतील स्थिती उत्तम असल्याने त्यांना एक अधिक चान्स मिळाला आहे. गुजरातने आतापर्यंत 14 पैकी 10 सामने जिंकत 20 गुण मिळवले आहेत, तर राजस्थानने 14 पैकी 9 सामने जिकंत 18 गुण मिळवले आहेत. 


आज पार पडणाऱ्या गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात जाईल. तर पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार नसून संबधित संघाला एक आणखी संधी मिळेल. हा संघ बुधवारी होणाऱ्या लखनौ आणि बंगळुरु यांच्यातील एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघासोबत सामना खेळेल. लखनौ-बंगळुरु सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार असून विजेता संघ आजच्या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाशी 27 मे रोजी सामना खेळेल, ज्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात पोहचणारा दुसरा संघ असेल. 


गुजरात विरुद्ध राजस्थान अशी असेल ड्रीम 11 (GT vs RR Best Dream 11)


विकेटकीपर-  संजू सॅमसन, जोस बटलर, रिद्धिमान साहा


फलंदाज- डेविड मिलर, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल 


ऑलराउंडर - रवीचंद्रन आश्विन, हार्दिक पांड्या


गोलंदाज- राशिद खान, युजवेंद्र चहल, ओबेद मॅकॉय. 


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात पार पडणार आहे. राजस्थान रॉयल्सचा रेकॉर्ड या मैदानावर खास नसून त्यांनी या ठिकाणी खेळलेल्या 9 सामन्यांतील केवळ 2 सामने जिंकले आहेत. त्यात मागील 5 सामन्यातील 3 सामने हे चेस करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यात सामनाही सायंकाळी आहे अशामध्ये दवाची अडचणही येऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकून संघ गोलंदाजी आधी घेण्याची अधिक शक्यता आहे.   


हे देखील वाचा-