IND vs SA: आयपीएलनंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ज्यात सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याचाही समावेश आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात उमरान मलिकनं सातत्यानं 150 किमी प्रतितासानं गोलंदाजी केली आहे. त्याची गोलंदाजीपाहून अनेक दिग्गज खेळाडू प्रभावित झाले आहेत. दरम्यान, उमरान मलिकचं भारतीय टी-20 संघात निवड झाल्यानंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफाननं (Irfan Pathan) केक कापून आनंद साजरा केला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड व्हायरल होत आहेत. 


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये इरफान पठाण केक कापताना दिसत आहे. त्याठिकाणी हैदराबाचा उब्दुल समददेखील उपस्थित आहे. इरफान पठाननं या दरम्यानचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. इरफान पठाणनं दिर्घकाळ जम्मू-काश्मीर क्रिकेटसह काम केलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली उमरान मलिक आणि अब्दुल समद यांसारख्या खेळाडूंनी सराव केला आहे. यामुळं उमरान मलिक आणि अब्दुल समद दोघंही इरफान पठाणचा आदर करतात. 




 


इरफान पठाण काय म्हणाला?
या सेलिब्रेशनचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना इरफान पठाणने लिहिले की, 'उमरान मलिकचे अभिनंदन, आशा आहे की तुझे पदार्पण जम्मू-काश्मीरच्या मुलांसाठी प्रेरणादायी ठरेल.' अब्दुल समदसाठी तर इरफान पठाणने लिहिलं की त्याची पण वेळ येईल.


उमरान मलिकची दमदार कामगिरी
आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्याआधी सनरायझर्स हैदराबादनं उमरान मलिकला 4 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं. आयपीएल 2022 मध्ये उमराननं उत्कृष्ट गोलंदाजी केलीय. या हंगामात त्याचा सरासरी वेग 145 ते 150 किमी प्रतितास इतका होता. त्यानं आयपीएलच्या मागच्या हंगामात 157 किमी प्रतितासाच्या वेगानं टाकला होता. उमरान मलिकनं 14 सामन्यांत एकूण 22 विकेट घेतल्या आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत तो टॉप-5 मध्ये सामील झाला.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उम्रान मलिक.


हे देखील वाचा-