IPL 2022 Qualifier 1 : बहुचर्चित आयपीएल 2022 (IPL 2022) आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. लीग सामने संपले असून आजपासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. गुजरात टायटन्स (GT), राजस्थान रॉयल्स (RR), लखनौ सुपर जॉयंट्स (LSG) आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB) हे संघ प्लेऑफमध्ये असून  रविवारी अर्थात 29 मे रोजी यांच्यातीलच दोन संघ अंतिम सामना खेळतील. दरम्यान आज कोलकात्याच्या ईडन गार्डनमध्ये पहिला क्वॉलीफायरचा सामना खेळवला जाणार आहे. तर या भव्य स्पर्धेचे हे महत्त्वाचे सामने पार पडताना पावसाचा व्यत्यय आल्यास काय नियम असतील? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत... 


1. सुपर ओव्हर खेळवली जाईल.


फायनलसह सर्व प्लेऑफच्या सामन्यांदरम्यान जर पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना होऊ शकला नाही, तर निर्णय 5 ओव्हरची मॅच खेळवून केला जाईल. किंवा सुपर ओव्हरही खेळवली जाऊ शकते. 


2. 200 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळेल.  


सुपर ओव्हर किंवा 5 ओव्हरची मॅच खेळवण्यापूर्वी प्लेऑफ तसंच अंतिम सामन्यासाठी 200 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे. यानुसार जर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 9.40 पर्यंत सुरु झाला तरी ओव्हर कमी न करता 200 मिनिटं अधिक वेळ सामना खेळवला जाऊ संपूर्ण 20 ओव्हर खेळवल्या जातील. अंतिम सामना 8 वाजचा सुरु होणार असून इतर प्लेऑफचे सामने 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील.


3. गुणतालिकाही महत्त्वाची


दोन्ही क्वॉलीफायर तसंच एक एलिमिनेटर सामन्यासाठी कोणताही रिझर्व्ह डे नाही. त्यामुळे जर पावसाच्या व्यत्ययामुळे सुपर ओव्हरही झाली नाही, तर गुणतालिकेतील गुणांच्या तुलनेने सामन्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे गुणतालिकेत वर असणारा संघ पुढील सामन्यात पोहोचेल. 


4. अंतिम सामन्यासाठी रिझर्व्ह डे 


प्लेऑफच्या पहिल्या तीन सामन्यांना रिझर्व्ह डे नसला तरी फायनल सामन्यासाठी एक रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे 29 मे रोजी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना पार पडला नाही, तर 30 मे रोजी सामना खेळवला जाईल.


5. फायनल सामन्यासाठी अतिरिक्त 2 तास


29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी प्लेऑफच्या सामन्याप्रमाणे अधिक 200 मिनिटं असण्यासोबत अतिरिक्त 2 तासही मिळतील. त्यानंतरही निर्णय न आल्यास सुपर ओव्हर किंवा 5 ओव्हरची मॅच खेळवली जाईल.



हे देखील वाचा-