Hyderabad fc vs Kerala blasters : क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल खेळाला मागील काही वर्षात चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारताची स्वत:ची फुटबॉल लीग इंडियन सुपर लीग (ISL) 2014 पासून सुरु झाली. यंदाचं या लीगचा आठवा सीजन असून केरळा ब्लास्टर्स आणि हैदराबाद फुटबॉल क्लब (Hyderabad fc vs Kerala blasters) या दोन संघात सामना होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघानी एकदाही जेतेपद मिळवलं नसल्याने आज आयएसएलला एक नवा चॅम्पियन मिळणार आहे. सामना आज सायंकाळी साडेसात वाजता खेळवला जाणार आहे. 


केरळा ब्लास्टर्स तिसऱ्यांदा ISL फायनल खेळणार आहे. केरळाला याआधी दोन्ही वेळेस फायनलच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. केरळा ब्लास्टर्स यंदा लीग स्टेजमध्ये चौथ्या स्थानावर होती. ब्लास्टर्सने सेमीफायनलमध्ये जमशेदपुर एफसीला 2-1 ने मात देत एग्रीगेटच्या जोरावर फायनलमध्ये स्थान मिळवलं. दुसरीकडे हैदराबाद एफसी पहिल्यांदाच आयएसएलच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. यंदा त्यांनी अप्रतिम प्रदर्शन सुरु ठेवलं आहे. लीग स्टेजमध्येही ते दुसऱ्या स्थानावर होते. सेमीफायनलमध्ये त्यांनी मोहन बागानला 3-2 च्या फरकाने मात देत एग्रीगेटमुळे फायनलचं तिकीट मिळवलं आहे. 


कधी आणि कुठे पाहाल सामना?


हैदराबाद एफसी आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यातील आजचा ISL चा फायनल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी पाहता येईल. याचं लाइव टेलीकास्ट स्टार स्पोर्ट्स 2/HD आणि स्टार स्पोर्ट्स 3/HD वर असेल. तसच लाईव्ह स्ट्रिमिंग डिजनी+हॉटस्टार अॅपवर देखील होणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha