LSG vs RCB, Match Live Update : आरसीबीचा लखनौवर 18 धावांनी विजय
IPL 2022 : नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर आज लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हा सामना पार पडणार आहे.
नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 31 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं लखनौला (Lucknow Super Giants Vs Royal Challengers Bangalore) 18 धावांनी पराभूत केलं आहे.
बंगळुरू विरुद्ध सामन्यात लखनौचा संघ डगमगताना दिसत आहे. 116 धावांवर लखनौचा अर्धा संघ माघारी परतला आहे.
लखनौ संघाला दोन झटके बसले आहेत. डि कॉक 3 तर पांडे 6 धावा करुन बाद झाला आहे.
फाफने झळकावलेल्या 96 धावांच्या जोरावर आरसीबीने लखनौला विजयासाठी 182 धावांचे आव्हान दिले आहे.
आरसीबीचा कर्णधार फाफने दमदार अशा 64 चेंडूत 96 धावा केल्या असून अवघ्या चार धावांनी त्याचं शतक हुकलं आहे.
शाहबाज अहमद धावचीत होऊन तंबूत परतला आहे.
लखनौविरुद्ध फाफ डू प्लेसिसनं अर्धशतक ठोकलं आहे. त्यानं 44 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. ज्यात 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.
एकामागे एक गडी बाद होत असताना बंगळुरु संघाचा डाव फाफने सांभाळला असून बंगळुरुची धावसंख्या 100 वर पोहोचली आहे.
लखनौच्या संघानं भेदक गोलंदाजी करत बंगळुरूच्या संघाला चौथा झटका दिला आहे.
लखनौविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बंगळुरूच्या संघाची खराब सुरूवात झालीय. बंगळुरूच्या संघानं पावर प्लेच्या आत तीन विकेट्स गमावले आहेत.
बंगळुरुची सुरुवात अत्यंत खराब झाली असून अनुज रावत 4 धावा करुन तर कोहली शून्य धावांवर बाद झाला आहे. चमिराने दोन्ही विकेट्स घेतल्या आहेत.
अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, आकाश दीप, मोहम्मद सिराज
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, मनिष पांडे, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.
लखनौ संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बंगळुरुचे फलंदाज आधी मैदानात उतरतील.
जगातील महान फलंदाज असून देखील मागील काही काळापासून खास फॉर्ममध्ये नसलेला विराट आजतरी कमाल करणार का? पाहावे लागेल
अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, आकाश दीप, मोहम्मद सिराज
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, मनिष पांडे, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज लखनौ सुपरजायंट्स (LSG) आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) या गुणतालिकेत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघानी यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत चार-चार विजय मिळवले असून आज जिंकणारा संघ पाचवा विजय नावावर करणार आहे.
पार्श्वभूमी
LSG vs RCB, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 31 वा सामना लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (LSG vs RCB) या दोन संघामध्ये पार पडत आहे. दोन्ही संघानी यंदाच्या हंगामात (IPL 2022) आतापर्यंत प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत. त्यामुळे लखनौ तिसऱ्या तर बंगळुरु चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे आज पाचवा विजय मिळवून 10 गुण खिशात घालण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत.
आजचा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर (D.Y.Patil Stadium) खेळवला जाणार आहे. खेळपट्टीचा विचार करता याठिकाणी दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होत आहे. पण याआधी झालेल्या सायंकाळच्या दोन्ही सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला आहे. गुजरात आणि चेन्नई दोन्ही संघानी प्रथम फलंदाजी करत एक मोठं आव्हान समोरच्या संघाला दिलं. जे दुसऱ्यांदा फलंदाजी करताना समोरील संघ पार करु शकला नाही आणि प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला.
लखनौ अंतिम 11
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, मनिष पांडे, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.
बंगळुरु अंतिम 11
अनुज रावत, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, आकाश दीप, मोहम्मद सिराज
हे देखील वाचा-
- DC vs PBKS, IPL 2022 : दिल्ली संघात कोरोनाच्या शिरकावामुळे आयपीएलच्या सामन्यात बदल; पुण्याऐवजी मुंबईत होणार सामना
- RR Vs KKR: फिंच- अय्यरची अर्धशतकी खेळी व्यर्थ; कोलकात्याचा 7 धावांनी पराभव, चहल ठरला राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार
- Mitchell Marsh Covid Positive: दिल्लीचा ऑलराऊंडर मिशेल मार्श कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -