Virat Kohli :  आयपीएल 2022 (Ipl 2022) स्पर्धेच्या एलिमेनेटर सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुने लखनौ सुपरजायंट्स संघाला 14 धावांनी मात दिली. या सामन्यात विराटने केवळ 25 रनच केले असले तरी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या एका रिएक्शनने सर्वांचेच लक्ष्य वेधले आहे. विराटला मैदानात भेटायला आलेल्या एका चाहत्याला कोलकाता पोलिसांनी ज्याप्रकारे मैदानाबाहेर नेलं, त्यावेळी विराटने दिलेली रिएक्शन चांगलीच व्हायरल होत आहे.


नेमकं काय घडलं?


सामन्यात 208 धावांचा पाठलाग करताना लखनौचा संघ फलंदाजी करत होता. मोठे लक्ष्य असतानाही लखनौ संघाकडून चांगली फलंदाजी करत होता. यावेळी विराट कोहली सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्याचवेळी एक चाहता थेट मैदानात आला, त्याने मैदानात उडी मारत कोहलीच्या दिशेने धाव घेतली. पण तो कोहलीला भेटणार त्याआधीच कोलकाता पोलिसांनी त्याला पकडत थेट मैदानाबाहेर नेलं. यावेळी पोलिसांनी त्याला अगदी WWE खेळात ज्याप्रकारे एकमेंकाना उचलून फेकतात, त्याप्रकारेच उचललं. त्यामुळे पोलिसांनी चाहत्याला बाहेर नेताच कोहलीने देखील अगदी तशीच WWE खेळामधील खेळाडू जॉन सीनासारखी रिएक्शन दिली.


पाहा व्हिडीओ-



बंगळुरुचा 14 धावांनी विजय


नाणेफेक जिंकून लखनौचा कर्णधार राहुलने प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर बंगळुरुची सुरुवात खराब झाली. सलामीवीर आणि कर्णधार फाफ शून्यावर बाद झाल्यानंतर रजतने संघाचा डाव सांभाळला. रजतने दमदार असं शतक लगावल्याने आरसीबीने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 207 धावा केल्या. पाटीदार आणि कार्तिकच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावरच हा धावांचा डोंगर उभा केला. 208 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला क्विंटन डिकॉक अवघ्या सहा धावा काढून बाद झाला. संघाकडून केवळ राहुल आणि दीपक हुड्डा यांनी चांगली फलंदाजी केली. 61 चेंडूत 96 धावांची भागिदारी दोघांनी केली. दीपक हुड्डा 26 चेंडूत 45 धावा काढून बाद झाला. तर राहुलही 79 धावांवर बाद धाला. ज्यानंतर अखेरच्या षटकात लुईसला लखनौला विजय मिळवून देण्यात अपयश आले आणि आरसीबीचा 14 धावांनी विजय झाला.


हे देखील वाचा-