Daryl Mitchell Leaves Rajasthan Royals : क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान आणि आरसीबी यांच्यामध्ये सामना होणार आहे. त्याआधी राजस्थान संघातील खेळाडूने बयो बबलमधून एक्झिट घेतली आहे. होय... 27 तारखेला राजस्थानचा संघ क्वालिफायर 2 चा सामना खेळणार आहे. पण त्यापूर्वीच न्यूझीलंडचा डॅरेल मिचेलने (Daryl Mitchell) राजस्थानच्या बायो बबलमधून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी आयपीएलमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सला गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थानचा सामना आरसीबीसोबत होणार आहे.  राजस्थानचा संघ अहमदाबादसाठी रवाना झाला आहे...






डॅरेल मिचेल न्यूझीलंड संघाकडून खेळण्यासाठी मायदेशी परतलाय. दोन ते 27 जून दरम्यान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. तीन सामन्याची ही मालिका कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भाग आहे. राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकाराने मिचेलला धन्यवाद केलेय. राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केलेय.  






दरम्यान, राजस्थान रॉयल्सने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले होते. पण क्वालिफायर 1 च्या सामन्यात गुजरातकडून सात विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थान रॉयल्सने सहा विकेटच्या मोबदल्या 188 धावा केल्या होत्या. पण गुजरातने तीन गड्यांच्या मोबदल्यात 191 धावा केल्या. यामध्ये डेविड मिलरने नाबाद 68 धावांची खेळी केली. गुजरातच्या संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. क्वालिफायर 2 मध्ये जिंकणारा संघ गुजरातसोबत फायनलला खेळणार आहे.


 हे देखील वाचा-