IPL Records : आयपीएल 2022 चा हंगाम काही दिवसांत संपणार आहे. एलिमेनटर सामन्यात आरसीबीने लखनौसमोर 207 धावांचा डोंगर उभा केला होता. पण आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्या संघाने 200 पेक्षा जास्त धावा केल्यात माहितेय का? 2008 मध्ये सुरु झालेल्या आयपीएल रनसंग्रामात आतापर्यंत धावांचा पाऊस पडलाय.. यामध्ये कोण कोणत्या संघाने कितीवेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्यात पाहूयात..  


आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात कोलकाता नाइटराइडर्सने रॉयल चॅलेंजर्सविरोधात 222 धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये ब्रेंडन मॅकलमने शतकी खेळी केली होती.. कालांतराने हा विक्रमही मोडला... आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक धावांचा विक्रम आरसीबीच्या नावावर आहे. आरसीबीने पुणे वॉरियर्सविरोधात 263 धावांचा डोंगर उभा केला होता.. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 200 पेक्षा जास्त धावा काढण्याचा विक्रम चेन्नईच्या नावावर आहे. तर दिल्लीने सर्वात कमी वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत...


चेन्नई सुपर किंग्स  -
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने चार वेळा आयपीएल चषक उंचावलाय. चेन्नईने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. चेन्नईने तब्बल 23 वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सची सर्वाधिक धावसंख्या 246-5 आहे. तीन एप्रिल 2010 मध्ये चेन्नईने राजस्थानविरोधात ही धावसंख्या उभारली होती.  2008 मध्ये चेन्नईने पहिल्यांदा 200 धावांचा पल्ला पार केला होता. पंजाबविरोधात चेन्नईने 240 धावा केल्या होत्या.  


आरसीबी -
आरसीबीला आयपीएलच्या इतिहासात एकदाही चषक उंचावता आलेला नाही. पण 200 पेक्षा जास्त धावा अनेकदा केल्या आहेत. आरसीबीने 15 वर्षात 21 वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.  2013 मध्ये आरसीबीने पुणे वॉरियर्सविरोधात 263 धावांचा डोंगर उभा केला होता. या सामन्यात ख्रिस गेलने नाबाद 175 धावांची खेळी केली होती. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वैयक्तिक खेळी आहे.  


पंजाब किंग्स  -
पंजाब किंग्सने 17 वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पंजाबच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावा 232 आहेत. 2011 मध्ये आरसीबीच्या विरोधात त्यांनी ही धावसंख्या उभारली होती.  


मुंबई इंडियन्स -
पाच वेळा आयपीएल चषक उंचावणाऱ्या मुंबईने 16 वेळा 200 पेक्षा जास्त धावसंख्या उभारल्या आहेत. 


कोलकाता नाइट राइडर्स -
दोन वेळा आयपीएल चषक उंचावणाऱ्या कोलकाताने 14 वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यांची सर्वोत्कृष्ट धावसंख्या 245इतकी आहे. 


 राजस्थान रॉयल्स -
राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये 14 वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 


सनराइजर्स हैदराबाद -
सनराइजर्स हैदराबादने 12 वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 


दिल्ली कॅपिटल्स - 
दिल्लीने फक्त 10 वेळा 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.