IPL 2022:  आयपीएलमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सनं पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफी जिंकली. या हंगामात अनुभवी खेळाडूंनी आपल्या कामगिरीने निराशा केली. तर, काही युवा खेळाडूंना आपली छाप सोडण्यात यश मिळवलं. भविष्यात हे युवा खेळाडू भारतीय संघाकडून खेळतानाही दिसू शकतात. या खेळाडूंनी आपल्या मार्गात गरिबी कधीही आडवी येऊ दिली नाही आणि त्यावर मात करत त्यांनी आयपीएलमध्ये चमक दाखवली. यातील काही खेळाडूंचे काय काम करतात? यावर एक नजर टाकुयात.


कुलदीप सेन
राजस्थान रॉयल्ससाठी शेवटच्या षटकात 15 धावा घेणाऱ्या कुलदीप सेननं या हंगामात सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. मध्य प्रदेशसाठी दरमदार खेळी केल्यानंतर आता कुलदीपनं आयपीएलमध्ये आपली छाप सोडली. रेवाचा रहिवासी असलेल्या कुलदीपचा आयपीएलपर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. कुलदीपचे वडील पेशानं न्हावी आहेत. घरातील मोठा मुलगा असणाऱ्या कुलदीपनं वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याला नेहमी चांगला फलंदाज बनायचं होतं. पण, प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून तो वेगवान गोलंदाजी करू लागला. त्याच्या खेळात कोणतीही बाधा येऊ नये, म्हणून अकादमीनं कुलदीपचे शुल्कही माफ केलं होतं.


तिलक वर्मा
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली असली, तरी या संघाचा युवा खेळाडू तिलक वर्मानं आपल्या कामगिरीनं क्रिकेट प्रेमींच्या मनावर छाप पाडली. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये 1.7 कोटींना विकल्या गेलेल्या तिलकसाठी आयपीएलचा हा प्रवास खूप कठीण होता. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचे वडील इलेक्ट्रिशियन होते आणि आपल्या मुलाच्या गरजा पूर्ण करण्यास असमर्थ होते. अशा परिस्थितीत तिलक यांच्या प्रशिक्षकाने त्याला पूर्ण पाठिंबा दिला. सलाम बायश यांनी तिलकला आपल्या घरात ठेवलं. तिलकचे वडील नंबुरी नागराजू यांच्याकडे आपल्या मुलाला क्रिकेट अकादमीत पाठवण्यासाठी पैसे नव्हते. अशा परिस्थितीत प्रशिक्षकानं त्याच्यासाठी क्रिकेटचे साहित्य खरेदी केलं. त्याचा क्रिकेट अकादमीचा बहुतांश खर्चही त्यांनीच उचलला. लॉकडाऊनच्या काळात तिलकच्या वडिलांचे काम पूर्णपणे थांबले होते. परिस्थिती अशी आली होती की, तिलकला क्रिकेट सोडावं लागेल. पण, या संकटाच्या काळात प्रशिक्षकानं त्याची साथ दिली आणि तिलकला आयपीएलपर्यंत पोहोचवलं.


रिंकू सिंह
केकेआरच्या शेवटच्या सामन्यात संस्मरणीय तुफानी खेळी करणारा रिंकू सिंह दीर्घकाळापासून आयपीएलच्या खेळाचा भाग आहे. मात्र, या हंगामात त्याला खरी ओळख मिळाली. लखनौविरुद्धच्या सामन्यात तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नसला तरी, त्यानं आपल्या जलद खेळीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रिंकूने आयपीएलपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट केले आहेत. ताला नगरी अलीगढ येथील रहिवासी असलेल्या रिंकूचे वडील गॅस विक्रेते आहेत. पाच भावांपैकी एक असणाऱ्या रिंकूला क्रिकेटची आवड होती. त्यानं प्रथम देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. त्यानंतर त्यानं कोलकात्याच्या संघात स्थान मिळवले आणि आता तो आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरला आहे.


हे देखील वाचा-