Kieron Pollard slams Aakash Chopra: मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डला आयपीएलच्या यंदाच्या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं आयपीएलचा यंदाचा हंगामात पोलार्डसाठी अखेरचा ठरू शकतो, असं मत अनेक दिग्गजांकडून व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानंही अनेकदा पोलार्डच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करून दाखवली. त्यानंतर गुरूवारी पोलार्डनं ट्विटरच्या माध्यमातून आकाश चोप्रावर टीका करणारं ट्वीट केलं. ज्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. परंतु, त्यानं हे ट्विट काही वेळात डिलीट केले पण आता त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आकाश चोप्रा त्यांचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी काहीही बोलतात, असं पोलार्डच्या ट्विटचा अर्थ होतो. 



पोलार्डनं असं ट्विट का केलं?
आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर अनेकदा सामने आणि खेळाडूंचे विश्लेषण करताना दिसतो. आयपीएल 2022 मधील त्याच्या विश्लेषणात, त्यानं मुंबईच्या सातत्यानं खराब कामगिरीवर अनेकदा पोलार्डला जबाबदार धरलं. तसेच यंदाचा हंगाम पोलार्डसाठी शेवटचा ठरू शकतो, असंही त्यानं सांगितलं होतं. यावर पोलार्डनं ट्विट करून संताप व्यक्त केला.


आयपीएल 2022 मधील पोलार्डचं प्रदर्शन
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कायरन पोलार्डसाठी वाईट ठरला. त्यानं 11 डावात 144 धावा केल्या. यादरम्यान, त्याचा स्ट्राईक रेट 107.46 इतका होता. अनेक प्रसंगी त्याच्याकडून वेगवान खेळी अपेक्षित होती, पण त्याला तसं करता आलं नाही. संपूर्ण हंगामात त्यानं फारशी गोलंदाजीही केली नाही. त्याला केवळ 4 विकेट घेता आल्या. त्यामुळेच मुंबईच्या खराब कामगिरीसाठी आकाश चोप्रा पोलार्डला जबाबदार धरत होता.


मुंबईच्या संघाची आतापर्यंची सर्वात खराब कामगिरी
आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्ससाठी हा सर्वात खराब हंगाम होता. मुंबईनं 14 पैकी 10 सामने गमावले. हंगामाच्या सुरुवातीला सलग 8 सामने गमावून मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर सर्वात पहिला बाहेर पडला. या हंगामात मुंबईनं अनेक खेळाडूंना संधी दिली. परंतु, त्यांनाही मुंबईला विजयी मार्गावर घेऊन जाता आलं नाही.या हंगामातील अखेरच्या सामन्यांमध्ये टीम डेव्हिड आणि डॅनियल सेम्स यांनी मुंबईसाठी सामने जिंकले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मुंबईसाठी या हंगामातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना तिळक वर्मासारखा महान फलंदाज मिळाला. पुढच्या हंगामात मुंबईच्या संघ जोरदार कमबॅक करेल? अशी अपेक्षा केली जात आहे. 


हे देखील वाचा-