ENG vs IND: भारतीय क्रिकेट संघ (Team India) जून महिन्यात इंग्लंडचा (England Tour) दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय संघ गेल्या वर्षी पाच सामन्याची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला गेली होती. या मालिकेतील चार कसोटी सामने खेळण्यात आलं. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पाचवा सामना पुढे ढकलण्यात आला. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवला जाईल. सध्या भारतीय संघ 4 सामन्यांनंतर 2-1 नं आघाडीवर आहे.या सामन्यानंतर मालिकेतील विजयी संघ निश्चित होईल. जर भारतीय संघ हा सामना जिंकण्यात किंवा ड्रॉ करण्यात यशस्वी ठरला तर मालिका टीम इंडियाच्या नावावर होईल. यापूर्वी 2007 मध्ये भारतीय संघानं इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळविलं होतं. या निर्णायक कसोटी सामन्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी हनुमा विहारीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
मोहम्मद अझरुद्दीन काय म्हणाले?
इंग्लंडविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराचं संघात पुनरागमन झालंय. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेनंतर त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. तर, श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यातही त्याला संघात जागा मिळाली नव्हती. परंतु, काऊन्टी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत त्यानं भारतीय संघात कमबॅक केलं आहे. पुजाराच्या पुनरागमनानंतर मोहम्मद अझरुद्दीननं हनुमा विहारीवर मोठे वक्तव्य केलं. ते म्हणाला की, "हनुमा विहारी श्रीलंकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला होता. त्यानं 3 डावात 31, 35 आणि 58 धावा केल्या. हनुमा विहारी हा युवा खेळाडू आहे. त्यामुळं त्याला आपल्या खेळात सुधारणा करण्याची संधी आहे. त्याला दीर्घकाळ कसोटी क्रिकेट खेळायचे असेल तर त्याला मोठी धावसंख्या करावी लागेल. त्याला संधीचं सोनं करून दाखवावं लागेल. 50-60 नव्हेतर शतकं केलं पाहिजे."
हनुमा विहारीची कामगिरी
हनुमा विहारीनं 2018 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावलं. हनुमा विहारीनं पदार्पणापासूनच भारतासाठी 15 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यानं 5 अर्धशतके आणि 1 शतकाच्या मदतीनं 808 धावा केल्या आहेत. हनुमा विहारीनं 2018 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीवीर म्हणून फलंदाजी केली. या सामन्यात त्याने 66 चेंडूत 8 धावा केल्या.
हे देखील वाचा-