ENG vs NZ: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्स मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यानं या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 1000 धावांचा टप्पा गाठला आहे. त्यानं तब्बल सात संघाविरुद्ध 1000 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या कामगिरीसह त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि एलिस्टर कुकच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. एवढेच नव्हेतर, कसोटी क्रिकेटमधील 10 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला 100 धावांची गरज आहे. 


सात संघांविरुद्ध एक हजार आणि त्याहून अधिक कसोटी धावा करणारा चौथा खेळाडू
सात किंवा अधिक संघांविरुद्ध 1000 किंवा त्याहून अधिक कसोटी धावा करणारा जो रूट चौथा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि अॅलिस्टर कूक यांसारख्या दिग्गजांसह रूटच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. त्यानं पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे.


न्यूझीलंडविरुद्ध जो रूटच्या 1000 धावा पूर्ण
न्यूझीलंडविरुद्ध 11 धावा करत रूटनं किवी संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध 14 सामन्यातील 25 व्या डावात त्यानं एक हजार धावांचा टप्पा गाठला आहे. यात दोन शतक आणि पाच अर्धशतकाचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याची सर्वोच्च धावसंख्या 226 आहे.


10 हजारांचा टप्पा गाठण्यापासून 100 धावा दूर
कसोटी क्रिकेटमधील 10000 धावा पूर्ण करण्यापासून जो रूट केवळ 100 धावा दूर आहे. त्यानं 118 कसोटी सामन्यांच्या 217 डावात 9 हजार 900 धावा केल्या आहेत. रुट आता इंग्लंडच्या दुसऱ्या डावात किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात ही कामगिरी करू शकतो. ही खास कामगिरी करणारा तो जगातील 14वा आणि अॅलिस्टर कूकनंतर इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरेल. 


हे देखील वाचा-