GT vs SRH : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 40 वा सामना आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स संघ विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरले असून गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम गोलंदाजी करुन हैदराबादला कमी धावांत रोखून समोरील लक्ष्य पार करण्याची रणनीती गुजरातची आहे. दोन्ही संघाच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीचा विचार यंदा आयपीएलमध्ये गुजरातने 7 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन तिसरं स्थान मिळवलं आहे. दोघांचा फॉर्म चांगला असल्याने आजचा सामनाही रोमहर्षक होऊ शकतो.



आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता गुजरात टायटन्सचा संघ कमाल फॉर्ममध्ये असल्याने त्यांनी संघात कोणतेही बदल केलेले नाहीत. तर दुसरीकडे सनरायजर्स हैदराबाद संघाने मात्र संघात एक बदल केला आहे. त्याचा दमदार अष्टरपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) संघात परतला आहे. त्यामुळे जगदीश सुचिथ याला विश्रांती देण्यात आली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...


गुजरात अंतिम 11


रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल, मोहम्मद शमी


हैदराबाद अंतिम 11


अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकिपर), शशांक सिंह, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, उम्रान मलिक, टी. नटराजन.


हे देखील वाचा-