Arjun Tendulkar Place Mumbai Indians : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). पण मुंबई संघाची यंदाच्या हंगामातील (IPL 2022) कामगिरी अत्यंत खराब असून त्यांनी 8 पैकी 8 सामने गमावले आहेत. मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपले असले तरी आगामी सामन्यातील त्यांचा खेळ स्पर्धेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. त्यामुळे यावेळी संघ कशी कामगिरी करणार हा प्रश्न सर्वांनाच असून सोबतच संघातील युवा खेळाडू आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) मैदानात उतरणार का? या चर्चेला देखील उधान आलं आहे. त्यात मुंबई इंडियन्स संघाने (Mumbai Indians) त्यांच्या इन्स्टाग्रामवर अर्जूनचा नेटमध्ये गोलंदाजी करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला असून या पोस्टमुळे त्याच्या आगामी सामन्यात पदार्पणाच्या चर्चेला आणखीच उधान आलं आहे.


पाहा व्हिडीओ-



मुंबईचं आव्हान कोणा-कोणाला?


मुंबई इंडियन्सचे अद्याप सहा सामने बाकी आहेत. या सहा सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. पण प्रतिस्पर्धी संघाला याचा फटका बसू शकतो. कारण मुंबईमुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. मुंबईकडे आता गमावण्यासाठी काहीच नाही, त्यामुळे मुंबईच्या संघावर दबाव नसणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ इतर संघाची वाट लावू शकतात. 


मुंबईचे उर्वरित सामने कुणासोबत अन् कधी?
30 एप्रिल - राजस्थान रॉयल्स
6 मे - गुजरात टायटन्स
9 मे - कोलकाता नाईट रायडर्स
12 मे - चेन्नई सुपरकिंग्स
17 मे - सनरायजर्स हैदराबाद
21 मे - दिल्ली कॅपिटल्स


हे देखील वाचा-