Mumbai Indians Captain : आयपीएल इतिहासात तब्बल पाच वेळा चषक उंचावणारा संघ मुंबई इंडियन्सची यंदाची कामगिरी मात्र अतिशय खराब दिसून येत आहे. त्यांनी सलग 8 पैकी 8 सामने गमावल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे. दरम्यान अशा खराब कामगिरीनंतर आता संघात मोठे बदल होण्याची शक्यता असून कर्णधार रोहित शर्माचं पदही धोक्यात आलं आहे. रोहितने आतापर्यंत संघाचा कर्णधार म्हणून अतिशय कमाल कामगिरी केली आहे. पण यंदा तितकीच त्याची कामगिरी खराब होताना दिसत आहे. यामुळे सोशल मीडियापासून ते सर्वत्र रोहितवर टीका होत असून आता त्यामुळेच त्याचं पदही धोक्यात आलं आहे. अशामध्ये मुंबईने पुढील हंगामासाठी कर्णधार बदलल्यास कोणाला ही संधी मिळेल यासाठी काही नावं चर्चेत आहेत.
- या यादीत सर्वात पहिलं नाव संघाचा उपकर्णधार किरॉन पोलार्ड याचं आहे. पोलार्डने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो आयपीएलमध्ये खेळत असून त्याने यातून निवृत्तीबाबत अजून कोणतेच संकेत दिलेले नाहीत. त्यात त्याला वेस्ट इंडिज संघाचं कर्णधारपद सांभाळण्याचा चांगला अनुभव असून तो मागील बऱ्याच काळापासून मुंबईचा उपकर्णधार देखील आहे. रोहितच्या अनुपस्थितीत तो कर्णधारपद सांभाळत असल्याने त्याला ही संधी मिळू शकते.
- मुंबई संघ यंदा खराब कामगिरी करत असली तरी संघाचा एक खेळाडू विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. तो म्हणजे फलंदाज सूर्यकुकुमार यादव. सूर्याने केलेल्या कामगिरीमुळे त्याला रिटेन करण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच रोहित शर्मानतंर सूर्यकुमार यादवला संघाचं कर्णधारपद दिलं जाऊ शकतं, अशी दाट शक्यता आहे.
- मुंबईसह भारतीय संघातील स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने आतापर्यंत संघासाछी कायम दमदार कामगिरी केली आहे. यंदाही गोलंदाजीचा सर्व भार त्याच्यावरच आहे. दरम्यान तो भारतीय संघाचाही उपकर्णधार राहिला असल्याने तो मुंबई इंडियन्सचं कर्णधारपदही सांभाळू शकतो. त्याला मुंबई संघ संपूर्ण संघ व्यवस्थापन याचा दांडगा अनुभव असल्याने त्याला ही संधी मिळू शकते.
हे देखील वाचा-