Most consecutive losses : आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सच कामगिरी निराशाजनक झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला यंदा लागोपाठ आठ सामने गमावावे लागलेत. त्यामुळे मुंबईचा संघ प्ले ऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेलाय. यंदाच्या हंगामात प्लेऑफमधून बाहेर जाणारा मुंबईचा संघ पहिला आहे. लागोपाठ आठ सामने गमावल्यामुळे मुंबईच्या संघाला टीकेला सामोरं जावे लागत आहे. चाहतेही निराश झालेत. पण, इतकी खराब कामगिरी करणारा मुंबईचा संघ पहिलाच नाही... याआाधीही काही संघांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. 


 प्रत्येक हंगामात मुंबईला पहिले काही सामने गमावताना चाहत्यांना पाहयाची सवय आहे. मुंबईचा पहिला सामना देवाला... मस्करित म्हटले जाते. सोशल मीडियावर मिम्सही येतात. पण यंदाच्या हंगामात मुंबईची कामगिरी अतिशय निराशजनक झाली आहे. पण अशी खराब कामगिरी करणारा मुंबईचा संघ पहिला नाही. याआधीही काही संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. पाहूयात कोणते आहेत संघ.... 


लागोपाठ सर्वाधिक सामने गमावण्याचा विक्रम कोलकाता नाइट रायडर्सच्या नावावर आहे. 2009 मध्ये कोलकाता संघाला लागोपाठ नऊ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यादरम्यान एक सामना रद्द झाला होता. त्याशिवाय 2014 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (त्यावेळची दिल्ली डेअरडेविल्स) संघालाही लागोपाठ नऊ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. 


 पुणे वॉरिअर्सचीही परिस्थिती काही अशीच होती. 2012 मध्ये पुणे संघालाही अशाच लागोपाठ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पुणे संघाला 2012 मध्ये अखेरच्या नऊ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याशिवाय 2013 मधील सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव झाला होता. त्यामुळे लागोपाठ 11 सामन्यात पुणे संघाला पराभव स्विकारावा लागला होता.  


दरम्यान, आयपीएल इतिहासात तब्बल पाच वेळा चषक उंचावणारा संघ मुंबई इंडियन्सची यंदाची कामगिरी मात्र अतिशय खराब दिसून येत आहे. त्यांनी सलग 8 पैकी 8 सामने गमावल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.  मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे.